एक G काय करु शकतो, तर आयुष्य उद्धवस्त करु शकतो, होत्याचं नव्हतं करु शकतो, वाचा ही धक्कादायक गोष्ट

इंग्रजीमध्ये G फॉर गोट येतं. पण खऱ्या आयुष्यात G मुळे एका जोडप्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं. होत्याचं नव्हतं झालं. हा G कोण आहे? हा एक G काय करु शकतो, वाचा ही धक्कादायक गोष्ट

एक G काय करु शकतो, तर आयुष्य उद्धवस्त करु शकतो, होत्याचं नव्हतं करु शकतो, वाचा ही धक्कादायक गोष्ट
Laxmi
| Updated on: Dec 23, 2025 | 12:50 PM

एका 48 वर्षाच्या पतीने त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या 24 वर्षाच्या पत्नीची हत्या केली. तिला यासाठी मारुन टाकलं कारण नवऱ्याला संशय आला की, पत्नीच्या आयुष्यात दुसरा पुरुष आहे. पत्नीने त्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू सुद्धा आपल्या हातावर गोंदवून घेतलेला, असं आरोपी पतीच म्हणणं आहे. पत्नीने या बद्दल नवऱ्याला स्पष्टीकरण दिलं. त्याला सांगितलं हे कोणाचं नाव आहे. पण तरीही पतीच्या मनात संशय कायम होता. तो दारु पिऊन घरी यायचा आणि ही एकच गोष्ट सारखी विचारायचा. हा G कोण आहे?. एक दिवस अचानक त्याने रागाच्या भरात पत्नीची मर्डर केली. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 48 वर्षाचा प्रदीप मिश्रा पेशाने ऑटो ड्रायव्हर आहे. तो गुन्हेगारी मानसिकतेचा व्यक्ती आहे. 307 च्या गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आलेल्या प्रदीप मिश्रावर चोलापूर आणि चौबेपुर पोलीस ठाण्यात अर्ध्या डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. 19 डिसेंबरला प्रदीप त्याच्या बहिणीकडे चंदवक जौनपूर येथे आलेला. तिथे त्याची बायको लक्ष्मी सुद्धा होती. त्याने पुन्हा एकदा पत्नीला तोच प्रश्न विचारला. तुझ्या एकाहातावर माझ्या आणि तुझ्या नावाचा टॅटू आहे. दुसऱ्या हातावर कोणाचं नाव गोंदवलय?. G वरुन कोणाचं नाव येतं?. नवऱ्याने पुन्हा हा प्रश्न विचारताच लक्ष्मी खवळली. ओरडून बोलली G फॉर गुड्डू जे तुझ्या घराचं नाव आहे. पण प्रदीपला विश्वास बसला नाही. पती-पत्नीमध्ये भांडण सुरु राहिलं.

रात्री 11 वाजता बाहेर घेऊन गेलो

प्रदीपच्या बहिणीने मध्ये हस्तक्षेप करुन वाद शांत केला. प्रदीपने पोलिसांना सांगितलं की, भांडण मिटल्यानंतर मी चहा पाजण्याच्या बहाण्याने पत्नीला रात्री 11 वाजता बाहेर घेऊन गेलो. रस्त्यातच पत्नीला जीवे मारण्याचा प्लान केलेला. रस्त्यात दानगंज जवळ रिक्षा थांबवून मफलरने मी लक्ष्मीची हत्या केली. मग सिमेंटच्या दगडाने तिचं डोकं ठेचलं. चेहरा खराब केला. जेणेकरुन कोणी तिला ओळखू नये. राग खूप होता म्हणून तिच्या पायावर सिमेंटच्या दगडाने घाव केले. राग शांत झाल्यानंतर मृतदेह खेचून जवळच्या झुडपात टाकला.

पोलिसांसाठी ही ब्लाइंड केस

लोकांनी पोलिसांना कळवलं की, अज्ञात महिलेचा मृतदेह पडलेला आहे. पोलिसांसाठी ही ब्लाइंड केस होती. पण महिलेच्या दोन्ही हातावर असलेल्या टॅटूमुळे पोलिसांना महत्वाचा पुरावा सापडला. मृत महिला 24-25 वर्षाची होती. तिच्या दोन्ही हातावर टॅटू होता. एका हातावर P आणि L अक्षर आणि दुसऱ्या हातावर G आणि L अक्षराचा टॅटू होता. हातावर टॅटू असलेल्या बेपत्ता महिलेची कोणी तक्रार नोंदवलीय का? याच पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली.

प्रदीप मिश्राची कुंडली तपासली

पोलिसांना समजलं की, लक्ष्मी मिश्राच्या दोन्ही हातावर टॅटू असून कुटुंबीय तिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी प्रदीप मिश्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा फोन बंद होता आणि तो फरार होता. पोलिसांनी प्रदीप मिश्राची कुंडली तपासली, तेव्हा समजलं की, तो हिस्ट्री शीटर आहे. पोलिसांनी त्याचा फोन सर्विलांसवर टाकला. खबरीने दिलेल्या माहितीच्या आधारावर सोमवारी सकाळी 11 वाजता चोलापूरच्या महमूदपुर येथून प्रदीप मिश्राला अटक केली.