गाऊन घालून अँब्युलन्समधून चोरट्यांची एंट्री, गॅस कटरने ATM फोडून कॅश लंपास !

तेलंगणच्या कामारेड्डी जिल्ह्यामध्ये चोरांनी अत्यंत अनोख्या पद्धतीने SBI ATM मधून चोरी केली. अँब्युलन्समधून आलेल्या चोरांनी एटीएम कापून, कॅश लुटली आणि ते फरार झाले.

गाऊन घालून अँब्युलन्समधून चोरट्यांची एंट्री, गॅस कटरने ATM फोडून कॅश लंपास !
| Updated on: Oct 12, 2026 | 6:01 PM

Telangana ATM Robbery : तेलंगणमध्ये एक अनोख्या पद्धतीने चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. तिथे कही चोर चक्क नाईटी / गाऊन घालून अँब्युलन्सममधून आले आणि त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचं (SBI) एटीएम फोडून, तयातली कॅश घेऊन ते फरार झाले. एटीएम लुटीची ही घटना राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात झाली. रविवारी झालेल्या या भयानक चोरीचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं, त्यामध्ये चोरी करणारे एम्ब्युलन्समधून ATM जवळ येताना दिसले. ते रात्री एम्ब्युलन्समधून उतरले आणि नंतर ATM मध्ये जाऊन कटरने त्यानी मशीन कापलं. त्यानंतर त्यांनी पैसे घेतले आणि ते तिथून फरार झाले. SBIचं ATM फोडून पैसे चोरी झाल्याच्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. अनेक नागरिक दहशतीखाली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Loading...

रात्री 1 ते 1.30 दरम्यान झाली चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास गांधारी मंडल केंद्रातील कामारेड्डी-बांसवाडा मुख्य मार्गावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरी झाली. पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅम्ब्युलन्समधून आलेल्या चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी मशीनवर काही रसायन फवारलं. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास एटीएम मशीनची तोडफोड झाल्याचं आलं. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. तसेच एटीएममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित चोरट्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

किती कॅशवर मारला डल्ला ?

चोरीसाठी वापरण्यात आलेली गाडी खरोखरच अ‍ॅम्ब्युलन्स होती की एखाद्या अन्य वाहनाला अ‍ॅम्ब्युलन्सचं स्वरूप देण्यात आलं होतं, याचाही पोलीस तपास करत आहेत. अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर करून चोरट्यांनी रस्त्यावरून सहज प्रवास करण्याची युक्ती केली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, एटीएममधून नेमकी किती रोकड चोरीला गेली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बँकेचे अधिकारी संबंधित नोंदी तपासत आहेत. चोरी झाली त्यावेळी एटीएम मशीनमध्ये किती पैसे होते, याची माहिती घेतली जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us