
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर युद्धाचे ढग दाटले आहेत. भारत कुठल्याही क्षणी हल्ला करेल असा पाकिस्तानकडून कांगावा केला जातोय. सीमेवर प्रचंड तणाव आहे. फायटर जेट्सचा आवाज ऐकू येतोय. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान सीमेवर अमृतसर येथे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF आणि पंजाब पोलिसांनी मिळून हे ऑपरेशन केलय. अमृतसरमधील भारोपाल गावातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला आहे. बीएसएफच्या इंटलेजिन्स विंगने दिलेल्या टिपच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. 30 एप्रिलच्या संध्याकाळी संयुक्त शोध मोहिम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये दोन हँड ग्रेनेड, तीन पिस्तुल, सहा मॅगझीन आणि 50 गोळ्या जप्त करण्यात आल्या.
पुढील चौकशीसाठी हा सर्व शस्त्रसाठा पोलिसांकडे देण्यात आला आहे. समन्वय साधून करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये बीएसएफ आणि पंजाब पोलिसांची सर्तकता आणि तयारी दिसून आली. अत्यंत चपळाईने समन्वय साधून ही कारवाई केली. पंजाब पोलिसांनी मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली आहे. कधी, कुठून कसा हल्ला होईल ही भिती पाकिस्तानला सतावत आहे. पाकिस्तानकडून अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे.
F-16 विमानं लपवली
पाकिस्तानमध्ये भिती इतकी आहे की, त्यांनी युद्धाचे सायरन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या एका मंत्र्याने मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवून दिलं आहे. यावेळी भारत सोडणार नाही, हे पाकिस्तानला चांगलं ठाऊक आहे. म्हणून त्यांच्याकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे. याआधी दोनदा 2016 आणि 2019 साली भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केला आहे. यावेळी परिस्थिती हातबाहेर जाईल ही भिती पाकिस्तानला आहे. भारत आपल्या अणवस्त्र तळांना लक्ष्य करेल, म्हणून त्यांनी अणवस्त्र दुसऱ्याठिकाणी शिफ्ट केली आहेत. आपली सर्वात अत्याधुनिक F-16 विमानं लपवून ठेवली आहेत. पाकिस्तानकडून LOC वर सातत्याने शस्त्रसंधीच उल्लंघन सुरु आहे.