
पहलगामवरील अतिरेकी हल्ल्यानंतर दोन अण्वस्रधारी देश युद्धाच्या उबंरठ्यावर आहेत, अशात आता गुप्तचर संस्थांनी काश्मीरात पुन्हा हल्ले होऊ शकतात असा इशारा दिल्याने सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर मोडवर गेली आहे. लष्कर- ए- तैयबा या खतरनाक अतिरेकी संघटनेच्या मॉड्यूलपासून सावधान राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. या गुप्त माहितीनुसार हे खतरनाक मॉड्युल पुन्हा हल्ले करण्याच्या तयारीत आहे. अतिरेकी येथे टार्गेट किलींग सह मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे कश्मिरातील पर्यटकांनी हे राज्य सोडण्यास सुरुवात केली आहे.
जम्मू- काश्मिरातील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी मोठा हल्ला झाल्यानंतर त्यात २६ पर्यटकांचा हकनाक मृत्यू झाल्यानंतर एकीकडे सीमेवर चककमी झडत असताना पुन्हा नवा अलर्ट जारी झाला आहे. हा हल्ला The Resistance Front (TRF) ने केल्याचे आधी सांगितले जात होते. मात्र या संघटनेने दावा मागे घेतला आहे. पाकिस्तानने आम्ही देखील दहशतवादाने पीडीत आहोत असा कांगावा सुरु केला आहे.
दक्षिणी काश्मिर मॉड्यूलच्या निशारण्यावर असल्याचे उघडकीस आले आहे. अतिरेक्यांच्या निशाण्यावर अनेक टुरिस्ट प्लेस आहेत. त्यामुळे अशा टुरिस्ट स्पॉटचे संरक्षण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा एजन्सींना हायअलर्ट मोडवर ठेवले आहे.काश्मिरात पुन्हा हल्ले होण्याचा इशारा देण्यात आल्याने हा हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय सेना आणि निमसुरक्षा दले जागोजागी तैनात झाले आहे.
गुप्तचर खात्याच्या इनपुट्स नुसार आतंकवादी गट येत्या काही दिवसात पर्यटकांना पुन्हा लक्ष्य करूशकतात. अल्पसंख्यांक काश्मिरी पंडीताचे गट आणि सुरक्षा कर्मचारी या पायाभूत संरक्षण यंत्रणेवर आघात करण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा उघडकीस आला आहे.
पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या काही दिवसांनंतर जम्मू-कश्मीराच्या दोन मोठ्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सावध राहाण्याचा इशारा दिला आहे.कोणत्याही आपात्कालिन स्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज राहा. एका हॉस्पिटलने हा आदेश काही तासांनंतर मागे घेतला. शुक्रवारी सायंकाळी मेडिकल कॉलेज जम्मूने काश्मिरातील एक एडव्हायजरी जारी करीत कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.