थँक यू फ्रेंड्स, 24 तासात दुसऱ्यांदा पीएम मोदी इंस्टाग्रामवर, यावेळी काय म्हणाले ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री पुन्हा इंस्टाग्रामवर एक व्हिडियो पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी आपल्या अलिकडील व्हिडीओला पाहणाऱ्यांना आणि त्यावर कमेंट करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर शुक्रवारी रात्री पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी, त्यांचा पहिला व्हिडिओ पाहणाऱ्या आणि त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, “काल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या सूचनांबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.” गेल्या २४ तासांत पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्याची ही दुसरी वेळ आहे.
काल देखील शेअर केला होता व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशीरा इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला होता. यात त्यांनी पेपर लीक प्रकरणात सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली होती. हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॅबिनेट बैठकीत आपल्या सहकारी मंत्र्यांना देखील इंस्टाग्रामवर सक्रीय राहून सरकारच्या योजनांचा प्रसार करण्याचा सल्ला दिला आहे.
मोदी यांचे फॉलोअर वाढले –
आश्चर्य म्हणजे काल रात्री मोदी यांनी पोस्ट केलेल्या इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडीओने त्यांची फॅन फॉलोईंग खूपच वाढली आहे. त्यांनी एका व्हिडीओमुळे एक मिलियनहून जास्त फॉलोअर मिळवले आहेत. पीएम मोदी यांचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर सुमारे १६.३ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. शुक्रवारी पोस्ट केलेल्या व्हिडीओलाही पाहाता पाहाता एक मिलियनहून जास्त युजरने पाहिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलनानंतर पेपरफुटी प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही असे म्हटले होते. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मोदी यांनी दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारच्या व्हिडीओत म्हणाले की पेपर फुटी प्रकरणात दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात येणार आहे.
दोषींना कठोर शिक्षा
नीट पेपरफुटी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करणाऱ्या कायद्याच्या मसुद्यावर केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे. यासंदर्भातील विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच मांडले जाणार आहे. या विधेयकाच्या मसुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल नंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ते मंजुरीसाठी संसदेत सादर केले जाऊ शकते असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
येथे पाहा व्हिडीओ –