3rd AC ची सर्वात मोठी डोकेदुखी दूर ! वंदे भारत स्लीपरचा नवा दरवाजा पाहून तुम्ही हैराण व्हाल

वंदे भारत स्लीपरमध्ये भारतीय रेल्वेच्या प्रवाशांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. ही ट्रेन आता आरामदायक प्रवासासाठी परिपूर्ण झाली आहे. यातील सुविधा अशा आहेत की तुम्ही या ट्रेनला आतापर्यंतची सर्वोत्तम स्लीपर ट्रेन म्हणू शकता. गेटजवळील सीटच्या समस्येचेही निराकरण करण्यात आले आहे.

3rd AC ची सर्वात मोठी डोकेदुखी दूर ! वंदे भारत स्लीपरचा नवा दरवाजा पाहून तुम्ही हैराण व्हाल
vande bharat sleeper train 3rd ac door
| Updated on: Nov 04, 2026 | 9:19 PM

Vande Bharat Sleeper: वंदेभारत स्लीपरमध्ये प्रवाशांच्या अनेक अडचणींना दूर करण्यात आले आहे. आरामदायी प्रवासासाठी ही ट्रेन आता परफेक्ट झाली आहे. यातील सुविधा अशा आहेत की या ट्रेनला तुम्ही बेस्ट म्हणू शकता. यात डब्यातील आतील दरवाजाजवळ असणाऱ्या प्रवाशाच्या सिटला दरवाजाच्या उघडझाप झाल्यामुळे आता कोणताही त्रास होणार नाही. ही कोपऱ्यातील सीट ज्या प्रवाशाच्या नशीबी यायची त्याला रात्रभर झोप मिळायची नाही. 3 AC त बसणाऱ्या प्रवाशाच्या नशीबी गेट जवळची सीट आली तर त्याची पुरती झोप मोड व्हायची. मात्र, वंदेभारत स्लीपरमध्ये यावर उपाय शोधण्यात आला आहे. या ट्रेनमध्ये आता गेटजवळील प्रवाशाला कोणताही त्रास होणार नाही.

 

Loading...

Nalanda_index अकाऊंटवरुन या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ते कूपेत घुसताना गेटने एंट्री करतात. 3 AC मध्ये गेटच्या जवळ सीटवरील व्यक्तीला या डब्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांमुळे दरवाजाची उघडझाप होऊन त्रास व्हायचा. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलेय की वंदेभारत स्लीपरमध्ये डोअरचा मॅकेनिझम बदलण्यात आले आहे. यात सर्वसामान्य प्रवाशांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. यात दरवाजा उघडझाप होण्याचा कोणताही त्रास प्रवाशांना होत नाही. येथे कॅप्शनमध्ये लिहिलंय की छोट बदल प्रवासाचा आनंद चांगला करतील.

येथे पाहा व्हिडीओ –

 

X वरील या व्हिडीओ ट्रेनमध्ये एंट्री करताना दरवाजाचे फायदे सांगितले आहेत. यात आता स्लाईड डोअर दिला आहे, ज्याच्या उघडझाप होण्याने कोणताही आवाज येत नाही. सीट आणि दरवाजात अंतरही आता जास्त ठेवले आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता.

वंदेभारत स्लीपर अलिकडेच सुरु करण्यात आली आहे. मुंबई ते बंगुळुरु अशीही वंदेभारत स्लीपर सुरु झाली आहे. या ट्रेनमार्गावर टक्कर विरोधी यंत्रणा ‘कवच’ बसवण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा, ऑटोमेटिक स्लायडिंग प्लग डोअरचा देखील यात समावेश आहे. रिडींग लाईट देखील चांगल्या दर्जाची आहे. या वंदेभारत स्लीपर ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात हॉट वॉटर शॉवर देखील घेता येत आहे. या ट्रेनला दिल्ली ते वाराणसी मार्गावरही सुरु करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us