निवडणूक आयोगानंतर आता सुप्रीम कोर्ट इंडिया आघाडीच्या निशाण्यावर; न्यायालयावरही मोर्चा निघण्याची शक्यता

इंडिया आघाडीकडून निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर तर मोर्चा काढण्यात येणारच आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये देशातील न्यायव्यवस्थेवर देखील चर्चा झाली आहे.

निवडणूक आयोगानंतर आता सुप्रीम कोर्ट इंडिया आघाडीच्या निशाण्यावर; न्यायालयावरही मोर्चा निघण्याची शक्यता
india aghadi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 5:46 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आज या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सहा ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. इंडिया आघाडीकडून सहा ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, आणि डाव्या पक्षांसह जवळपास वीस पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.  या मोर्चामध्ये इंडिया आघाडीचे सर्व खासदार तसेच पदाधिकारी देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इंडिया आघाडीकडून निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर तर मोर्चा काढण्यात येणारच आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये देशातील न्यायव्यवस्थेवर देखील चर्चा झाली आहे. सुप्रीम कोर्टावर एक मोर्चा काढण्यासंदर्भात काही नेत्यांनी बैठकीत आपलं मत मांडलं आहे. देशातील महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल वेळेवर लागत नसल्यानं इंडिया आघाडीत नाराजी आहे.  देशातील महत्त्वाचे न्यायालयीन खटले तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भातील खटले सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासंदर्भात इंडिया आघाडीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

Loading...

ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल 

आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या पत्रकार परिषदेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.  या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वोट चोरी करुन भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. ज्ञानेश कुमार चोर आहेत, हे आता उघड झालं असल्याचं यावेळी ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us