जगातील सर्वात महाग आंबा, एक किलोसाठी मोजावे लागतात इतके लाख रुपये

आंब्याची एक प्रकार जगात चर्चेचा विषय बनला आहे. तो म्हणजे मियाझाकी आंबा. मियाझाकी सामान्य आहे का? आणि आजकाल तो का चर्चेत आहे ते सर्व काही जाणून घेऊया.

जगातील सर्वात महाग आंबा, एक किलोसाठी मोजावे लागतात इतके लाख रुपये
| Updated on: May 28, 2024 | 10:01 PM

कधी असे झाले आहे की, दुकानदाराने एखाद्या वस्तूसाठी ग्राहकाकडे ५० रुपये मागितले आणि ग्राहकाने त्याला ५०० रुपये दिले. पण असा अनुभव एका मियाजाकी आंबा विक्रेत्याला आलाय. तामिळनाडूतील एका आंबा विक्रेत्याने सांगितले की, बंगळुरूहून एक ग्राहक त्यांच्याकडे आला होता. या ग्राहकाने त्याच्याकडून 1 किलो मियाजाकी आंबा घेतला. हा आंबा 3000 रुपये किलो असल्याचे विक्रेत्याने सांगितल्यावर ग्राहकाने यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दर देण्यास सुरुवात केली. ही रक्कम या आंब्यासाठी योग्य असल्याचे ग्राहकाने सांगितले.

दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, ग्राहकाने त्याला 1 किलो मियाजाकी आंब्यासाठी 17,000 रुपये दिले. या आंब्यासाठी मिळालेला हा सर्वाधिक भाव आहे, असे नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मियाझाकी आंब्याची किंमत किलोमागे अडीच ते तीन लाखांपर्यंत जातेय.

मियाझाकी आंबा म्हणजे काय?

मियाझाकी आंबा हा मूळतः जपानमधील क्योशु येथे पिकवला जातो. जपानी ग्रेड मियाझाकी आंब्याचे वजन 350 ग्रॅमपेक्षा जास्त असले पाहिजे तरच तो खरा मियाझाकी आंबा मानला जातो. या आंब्यात साखरेचे प्रमाण किमान १५ टक्के असावे. त्याचा रंग आणि आकार पूर्णपणे योग्य असावा. या आंब्याला जपानी भाषेत ‘तायो नो तामागो’ असे म्हणतात. याचा अर्थ सूर्याची अंडी असा होतो. त्याच्या चमकदार रंगामुळे असे म्हटले जाते. अलीकडे सोशल मीडियामुळे हा आंबा खूप चर्चेत आला आहे.

एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांत जपानमध्ये विकले जाणारे सर्वात महाग फळ आहे. अहवालानुसार, या जातीची सुरुवातीची किंमत 8,600/- रुपये आहे. हा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात 2 लाख 70 हजार रुपये किलोपर्यंत विकला जातो. इतर देशांमध्ये निर्यात करण्यापूर्वी या आंब्यांची काटेकोरपणे तपासणी आणि चाचणी केली जाते.

जपान, थायलंड, फिलीपिन्स आणि भारतात देखील आता हा पिकवला जातो. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका बागायतदार जोडप्याने हा आंबा पिकवल्याचा दावा केला आहे. हे अनोखे आंबे चोरीला जाऊ नयेत, यासाठी त्याला चार रक्षक आणि सात कुत्रे त्याच्या रक्षणासाठी ठेवावे लागले होते.