या धनकुबेराला मतदारांनीच चारली होती धूळ; इतक्या कोटी संपत्तीच्या मालकाला पडली होती इतकी मतं

| Updated on: Mar 30, 2024 | 2:29 PM

Lok Sabha Richest Candidate : यापूर्वीच्या लोकशाहीच्या उत्सावात या धनिकाला लोकशाही काही पावली नाही. 2019 मध्ये या सर्वात श्रीमंत उमेदवाराला, लोकसभेच्या रिंगणात अवघी 1,558 मतं पडली होती. त्याच्या शपथपत्रानुसार, त्याच्याकडे 1,107 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता होती.

या धनकुबेराला मतदारांनीच चारली होती धूळ; इतक्या कोटी संपत्तीच्या मालकाला पडली होती इतकी मतं
लक्ष्मीपुत्राचा दणक्यात पराभव
Follow us on

लोकसभेच्या निवडणुकीत जनताच जनार्धन असते. आता विरोधक ईव्हीएम मशीन पण विजयाला पोषक असल्याचा वारंवार आरोप करत आहेत. पण लोकशाहीच्या या उत्सवात जनतेच्या मनात आले तरच अनेकांचे भाग्य उघडते नाही तर मतपेटीतच दबते, हे नक्की. कारण देशातील सर्वात श्रीमंत उमेदवाराला पण मतदार राजाने मतांच्या आधारे धूळ चारल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणूक 2024 चा बिगूल वाजला आहे. विविध राज्यात वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होईल. 4 जून रोजी लोकसभेचे निकाल समोर येतील. सध्या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. त्यासोबत शपथपत्र दाखल करत आहेत. त्यात त्यांच्या संपत्तीचा आकडा जाहीर करण्यात येतो.

केवळ 1,558 मतं

2019 मधील लोकसभा निवडणुकीत बिहारमधील एका उमेदवाराला जनतेने जागा दाखवून दिली. या उमेदवाराकडे थोडी थोडकी नव्हे तर हजार कोटींची मालमत्ता त्यावेळी त्याने जाहीर केली होती. पण त्याला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्याला केवळ 1,558 मतं मिळाली. त्यामुळे त्याची अमानत रक्कम पण जप्त झाली. एकूण 26 उमेदवारात मत गणनेनुसार त्याचा क्रमांक चौथा होता.

हे सुद्धा वाचा
  1. सर्वात श्रीमंत उमेदवार – वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार रमेश कुमार शर्मा हे होते. बिहारच्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात त्यांनी कंबर कसली होती. त्यावेळी पाच सर्वात श्रीमंत उमेदवारात शर्मा यांना सोडून इतर काँग्रेसचे होते. त्यातील तिघांनी पराभवाचे तोंड पाहिले नव्हते. शर्मा यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र दाखल केले होते. त्यानुसार, त्यांच्याकडे 1,107 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती होती.
  2. दुसरा श्रीमंत उमेदवार – 2019 मधील निवडणुकीत दुसरे श्रीमंत उमेदवर कोंडा विश्वेश्वर रेडी हे होते. त्यांची एकूण संपत्ती 895 कोटी रुपये होती. त्यांनी तेलंगणातील चेवेल्ला लोकसभेच्या रिंगणात शड्डू ठोकले होते. त्यांनी कडवी झूंज दिली. पण तेलंगाणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) उमेदवार जी. रंजीत रेड्डी यांनी त्यांचा पराभन केला होता.
  3. या श्रीमंत उमेदवाराने खेचून आणली विजयश्री – काँग्रेस नेता कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ 2019 मध्ये तिसरे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. ते लोकसभेच्या रिंगणात जिंकले. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती 660 कोटी रुपये होती. 2024 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, ही संपत्ती 700 कोटी रुपयांच्या घरात पोहचली होती.