मी लढणारा शिवसैनिक; भाजपात प्रवेशाविषयी अंबादास दानवे यांनी दिले असे रोखठोक उत्तर

Ambadas Danve : माझ्याविरोधात सातत्याने खोट्या बातम्या पसरविण्यात येत आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यामागे भाजप असल्याचे ते थेट म्हणाले. त्यांनी नुकतीच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रवेशाबाबत मत मांडले.

मी लढणारा शिवसैनिक; भाजपात प्रवेशाविषयी अंबादास दानवे यांनी दिले असे रोखठोक उत्तर
अंबादास दानवे यांचा महायुतीवर कडाडून हल्ला
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 12:11 PM

मी लढणारा शिवसैनिक आहे. भाजपसोबत इतक्या वर्षाची शिवसेनेची युती होती. याचा अर्थ शिवसेना भाजपात गेली असा होत नाही. काही लोक राजकीय जीवनाशी खेळतात. माझ्याविरोधत सातत्याने खोट्या बातम्या पसरविण्यात येत आहे, मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. हा सगळा प्रकार भाजपकडून करण्यात येत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी या बातम्यांचे खापर माध्यमांवर पण फोडले. भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेवर त्यांनी माध्यमांशी बोलताना सडेतोड उत्तर दिले. काय म्हणाले दानवे?

मी काम करणारा शिवसैनिक

मी विरोधी पक्षनेता आहे. लढणारा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची यादी जाहीर केलेली आहे. तरीही माझ्याविरोधात सातत्यानं खोट्या बातम्या मुद्दामहून पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेंना त्यांनी पूर्णविराम दिला. भाजपत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगोदर शिंदे गटात जाणार आणि आता भाजपात जाण्याच्या बातम्या बदनामीसाठी पेरल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचं हे काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

तर अगोदरच गेलो असतो

भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी अंबादास दानवे हे पूर्वाश्रमी भाजपचेच होते, असा सकाळीच बॉम्ब टाकल्यानंतर अंबादास दानवे भाजपात जात असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर त्यांना प्रश्न विचारला असता, 30 वर्षांपासून आपण शिवसेनेचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता भाजपत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ते म्हणाले. लोकसभाच नाही तर विधानसभ निवडणुकीत ही पक्षांतर करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत त्यांनी याविषयावर पडदा टाकला.

चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात प्रचार

उमेदवारीवरुन अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात रस्सीखेच होती. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी दानवे यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दोन्ही नेते एकमेकांवर नाराज असल्याचे बोलले जात होते. याविषयी दानवे यांना छेडले असता, चंद्रकांत खैरे यांना तिकीट देण्यात आले आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात प्रचार करणार असल्याचे ते म्हणाले.

महायुतीत आमच्याशी भिडण्याची ताकद नाही

मला कोणती ऑफर आलेली नाही असे दानवे यांनी स्पष्ट केले. महायुतीला मराठवाड्यात उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही. महायुतीच्या मराठवाड्यात किती उमेदवार निवडून येतात, यावर त्यांनी चिमटा काढला.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.