VIP Security : न्यायालयाने फटकारल्यानंतर आलं शहानपण; पंजाब सरकार सर्व व्हीआयपींना पुन्हा देणार सुरक्षा

| Updated on: Jun 07, 2022 | 5:37 PM

सध्या, न्यायालयाने 424 लोकांची सुरक्षा देण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 जूनपासून या सर्वांची सुरक्षा पुन्हा सुरळीत होणार आहे.

VIP Security : न्यायालयाने फटकारल्यानंतर आलं शहानपण; पंजाब सरकार सर्व व्हीआयपींना पुन्हा देणार सुरक्षा
पंजाब सरकार
Image Credit source: tv9
Follow us on

चंदीगड ( पंजाब) : पंजाबी गायक तसेच काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) यांची हत्येनंतर आता पंजाब सरकारने व्हीआयपींना पुन्हा सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुसेवाला यांची हत्येनंतर मान सरकारवर (Punjab Government) चौफेर टीका होत आहे. तर याप्रकरणी पंजाब आणि हरियाणामधील उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले होते. तसेच सुरक्षा काढण्याची यादी लीक झाल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता पंजाब सरकारकडून आपली चूक सुधारण्याकडे पाऊल उचलले जात आहे. पंजाबमधील भगवंत मान सरकारवरने ज्या 424 व्हीआयपींची (VIP Security) दिलेली सुरक्षा काढून घेतली होती आता त्यांना परत सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सरकारने पंजाब आणि हरियाणामधील उच्च न्यायालयात दिली आहे. येत्या 7 जूनपासून या महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा बहाल केली जाईल असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. पंजाब सरकारने राजकारणी, धार्मिक नेते, माजी राज्यसभा सदस्य, माजी आमदार, माजी सभापती, निवृत्त पोलीस कर्मचारी आणि इतरांसह 424 लोकांना सुरक्षा काढून घेतली होती. ज्यानंतर पंजाबमध्ये जोरदार राजकारण झाले होते.

424 लोकांची सुरक्षा देण्याचा निर्णय

सध्या, न्यायालयाने 424 लोकांची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. 7 जूनपासून या सर्वांची सुरक्षा पुन्हा सुरळीत होणार आहे. त्या व्हीआयपींची सुरक्षा त्यांच्या बाजूने मर्यादित कालावधीसाठी काढून टाकण्यात आली यावरही सरकारने भर दिला. पण एखाद्याची सुरक्षा काढून टाकायची असली तरी परिस्थितीचा योग्य आढावा घ्यावा, सर्व पैलूंवर विचारमंथन व्हायला हवे, तरच तसा निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

ज्या प्रमुख व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यात सुखदेव सिंग धिंडसा, इंदरबीर सिंग बुलारिया, शरणजीत सिंग ढिल्लोन, अनिल सरीन, माजी सभापती राणा केपी, लखबीर सिंग लाखा, इंदू बाला, दर्शन सिंग ब्रार, दिवंगत सिद्धू मुसेवाला, गणेश कौर मजिठिया, कुलजीत नागरा, मदनलाल जलालपूर, सुरजित धीमान, हरदयाल सिंग कंबोज, रुपिंदर रुबी, फतेह जंग बाजवा, सुखपाल भुल्लर, दिनेशसिंग बब्बू, संजय तलवार, जगदेवसिंग कमलू, हरमिंदर सिंग गिल, बडविंदर लाडी, जगतार सिंग जग्गा, दविंदर सिंग घुबया, निर्मल सिंग, निर्मल सिंग, अमर सिंग ढिल्लन, जोगिंदरपाल भोआ, धर्मबीर अग्निहोत्री, तिक्षन सूद आणि इंदरबीर सिंग बुलारिया आदींचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

धर्मगुरूंचाही समावेश

पंजाब सरकारने फक्त प्रमुख व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली नाही तर धर्मगुरूंचीही सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग आणि डेरा राधा स्वामी सत्संग ब्यास आणि इतर अनेक धार्मिक नेत्यांचा समावेश आहे.

यांचीही सुरक्षा काढली

माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याशिवाय पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या मुलाची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांचा मुलगा अर्जुन बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.