नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ‘दि वर्ल्ड ट्रॅव्हल एंड टूरिझम फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. आज १६ एप्रिल रोजी या फेस्टीव्हलचा तिसरा दिवस आहे. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही ९ आणि रेड हॅट कम्युनिकेशनच्यावतीने या इव्हेंटचे आयोजन केले आहे. या इव्हेंटला देखील लोकांनी खूप पसंद केले आहे.येथे पर्यटनाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा होत आहे. लोक या इव्हेंटला भेट देत आहे. मोठी गर्दी या संदर्भातील व्याख्यानाला झाली होती.
नवी दिल्लीत भरलेल्या या फेस्टीव्हलमध्ये पहिले दोन वर्कशॉप, पॅनल डिस्कशन आणि गायक Papon च्या लाईव्ह परफॉर्मेंसने माहोल बनविला.तर तिसऱ्या दिवशी देखील फेस्टीव्हलला प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. फेस्टीव्हलच्या तिसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये डेस्टीनेशन वेडिंग इंडस्ट्रीजवर एक महत्वाची चर्चा झाली आहे. या चर्चेत इंडियन होटल्स कंपनी लिमिटेड (IHCL)च्या व्हाईस प्रेसिडेन्ट ऑफ सेल्स ऋतिका गुप्ता देखील सामील झाल्या होत्या. ऋतिका गुप्ता यांनी सांगितले की लक्झरी हॉटेल चेन ताजने वेडिंग एक्सपिरियन्सला नवा आयाम दिला आहे. येथे परंपरा आणि आधुनिकता याचा योग्य संगम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
लग्नाच्या स्मृती जपण्यासाठी तरुण – तरुणी धडपडत असतात. त्यांना त्यांच्या विवाहात प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहीजे असते. मग तो मेकअप असो की जेवण असो की डेकोरेशन किंवा हॉस्पिटीलिटी असो. ही तिसरी पिढी आहे जी आमच्या सोबत वेडिंग डेस्टीनेशनचे प्लान करीत आली आहे. ताज हॉटेलकडे विवाहइच्छुक इंगेजमेंटपासून ते स्टेकेशनपर्यंतसाठी येतात.
या संदर्भात ऋतिका गुप्ता यांनी सांगितले की भारतात वेंडिंग इंडस्ट्री दर वर्षी १३० अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक कारभार करते आहे. आणि डेस्टीनेशन वेडिंग हा एक महत्वाचे अंग झाला आहे. ताज हॉटेल त्यांच्या भव्यता आणि आदरातिथ्यासाठी ओळखले जाते. जे त्या जोडप्यांना खास अनुभव देत असते,ते आपली लग्न खास आठवणीत राहील असे करु इच्छीतात. उदयपूरच्या शाही Taj Lake Palace पासून ते गोव्याच्या सुंदर अशा Taj Exotica अशा लोकेशन डेस्टीनेशन वेडिंगसाठी एक्सक्लुसिव्ह आणि एक शानदार ऑप्शन मानले जात आहे.
भारतीय लोक विवाहांवर दरवर्षी सुमारे १०० अब्ज डॉलर्स खर्च करतात. पण पूर्वीच्या आणि आताच्या विवाहांमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत, मग ते बदल कोणते आहेत? यावर उत्तर देताना रितिका म्हणाल्या की, पूर्वी पालक सर्वकाही व्यवस्थित करायचे. लग्नात सर्व प्रकारच्या प्रथा पाळल्या जात असत. पण आता तरुण पिढी जगभर प्रवास करत आहे. भारतात प्रवास करीत आहे आणि त्यांच्यासाठी काय योग्य आहे ते पाहत आहे. अशा परिस्थितीत, लग्न करणाऱ्या किंवा डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या तरुण पिढीला त्यांचे लग्न आता शांत आणि आल्हाददायक वातावरणात व्हावे असे वाटते.
असे गरजेचे नाही की सर्वांनीच ग्रँड वेडिंग करावे, काही लोक इंटिमेट वेडिंग देखील करीत आहेत. तेथे केवळ ते आपल्या अत्यंत जवळच्या मोजक्याच मित्र परीवार आणि नातलगांनाच बोलवू इच्छीतात. परंतू आपले इंटिमेट वेडिंग देखील पारंपारिक पद्धतीनेच पण चांगल्या ठिकाणी करु इच्छीतात. असे लोक आमच्या हॉटेल्समध्ये येत असतात असे त्यांनी यावेळी सांगितले.