ही दोन झाडं म्हणजे पावसाळ्यात सापांना निमंत्रणच, 100 पैकी 99 टक्के लोकांच्या असतात घरात

साप म्हटलं की अनेकांच्या अगांवर भीतीनं काटा उभा राहातो. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांपासून अधिक सावध राहण्याची गरज असते. असे काही झाडं आहेत, ज्या झाडांकडे साप आकर्षित होतात, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

ही दोन झाडं म्हणजे पावसाळ्यात सापांना निमंत्रणच, 100 पैकी 99 टक्के लोकांच्या असतात घरात
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 03, 2025 | 1:08 PM

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर सापांपासून अधिक सावध राहण्याची गरज असते. कारण पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी शिरतं, त्यामुळे साप वर येतात, आणि निवाऱ्यासाठी सुरक्षित व गरम जागा शोधतात. त्यामुळे अनेकदा साप आपल्याला घरांच्या कोपऱ्यांमध्ये जीथे अडचण आहे, अशा ठिकाणी दिसतात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पावसाच्या दिवसांमध्ये घराची स्वच्छता गरजेची असते. आसपासच्या परिसरामध्ये जर गवत वाढलं असेल तर ते वेळीच कापून परिसर स्वच्छ ठेवावा. त्यामुळे साप घरात येत नाहीत, आणि समजा आलाच तर तो लगेच आपल्याला दिसून येतो.

सामान्यपणे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या अधिक घटना घडतात. त्याचं कारण देखील हेच आहे. की पावसाळ्यात साप वर येतात, आणि अनेकदा आपलं भक्ष समजून ते तुमच्यावर हल्ला करतात. आपल्याकडे सापांबाबत अनेक गैरसमज आहेत. दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो, हा त्यातील मोठा गैरसमज आहे. त्यामुळे आपण दिसला साप की त्याला मारतो. मात्र हे चुकीचं आहे. साप कोणताही असो त्याची माहिती सर्पमित्रांना देणं गरजेचं असतं. जेणे करून सर्पमित्र या सापांना पकडून सुरक्षित अधिवासात सोडतील.

भारतामध्ये सापाच्या ज्या प्रमुख विषारी जाती आहेत, त्यामध्ये चार जातींच्या सापांचा प्रामुख्यानं समावेश होतो. यामध्ये कोब्रा, मण्यार, फुरसे आणि घोणस या प्रमुख चार जाती आहेत, त्यांना आपण बिग फोर असं देखील म्हणतो. सापांबाबत असलेल्या गैरसमजामुळे सध्या सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजातील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आता आपण जाणून घेऊयात अशी कोणती दोन झाडं आहेत? ज्यामुळे साप तुमच्या घरात येऊ शकतो.

केवडा – असं मानलं जातं की केवड्याचं झाडं हे सापांचं आवडत ठिकाण असतं, अनेकदा केवड्याच्या झाडाजवळ साप आढळून येतात. त्यामुळे अनेकजण तर हे झाडं लावण्याचं टाळतात. मात्र तरी देखील बऱ्याच लोकांच्या घरामध्ये हे झाडं आढळून येतं.

चाफा – दुसरं झाड म्हणजे चाफा, चाफ्याच्या झाडांमुळे देखील घरात साप येऊ शकतात. असं मानलं जातं. जर चाफ्याचं झाडं मोठं असेल आणि त्यावर पक्ष्यांची घरटी असतील तर पिल्लं खाण्यासाठी अनेकदा साप या ठिकाणी येतात. तसेच झाडाभोवती जर अडचण असेल तरी देखील साप या झाडाचा आसरा घेतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)