AAP Manish Sisodia : तळघरातील तुरुंगात रवानगी, झोपतील जमिनीवर! असा असेल नाश्ता

| Updated on: Feb 28, 2023 | 9:46 AM

AAP Manish Sisodia : CBI मुख्यालयातील तळघरात असलेल्या लॉक-अपमध्ये असा असेल आपच्या उपमुख्यमंत्र्यांचा दिनक्रम..नाश्त्यात मिळतील हे पदार्थ, झोपावे लागणार जमिनीवर

AAP Manish Sisodia : तळघरातील तुरुंगात रवानगी, झोपतील जमिनीवर! असा असेल नाश्ता
Follow us on

नवी दिल्ली : दारु घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांचे अटकसत्र गाजले. देशभर या अटकेवरुन राजकारण तापले. आपसोबतच इतर राजकीय पक्षांनी ही केंद्र सरकारची (Central Government) दडपशाही असल्याचा आणि विविध केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप केला. दारु घोटाळ्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ही करावाई केली. सिसोदीया यांना 5 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. सिसोदिया यांनी त्यांच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा करत कोठडीला विरोध केला होता. या दरम्यान सीबीआय अधिकारी त्यांची चौकशी करतील. या प्रकरणातील त्यांच्या सहभागाविषयी विचारपूस करतील.

सिसोदीया यांना सोमवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयात हजर केले असता सीबीआयने 5दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने सिसोदीया यांची 4 मार्चपर्यंत तपास संस्थेच्या कोठडीत रवानगी केली. आता सिसोदीया यांना सीबीआय मुख्यालयातील तळघरात असलेल्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.

या लॉकअपमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले आहे. त्याआधारे सिसोदीया यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे एक पथक या लॉकअप बाहेर तैनात करण्यात आले आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सीबीआयने सिसोदीया यांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने सिसोदीया यांची 4 मार्चपर्यंत तपास संस्थेच्या कोठडीत रवानगी केली. या कोठडीत आरोपीला दैनंदिन सुविधा पुरविण्यात येतात.

हे सुद्धा वाचा

सीबीआय ज्या आरोपीला अटक करते. त्याला सकाळी 8 वाजता नाश्ता देण्यात येतो. या नाश्त्यात चहा, बिस्कीट, टोस्ट अथवा इतर पदार्थांचा समावेश असतो. तर रात्री 7 ते 8 वाजेदरम्यान या लॉकअपमध्ये जेवण देण्यात येते. यामध्ये वरण, पोळी, भात आणि भाजी देण्यात येते. हे जेवण लॉकअपमध्ये ठेवण्यात येते. भूक लागली त्यावेळी आरोपी हे जेवण करतो. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनाही हा नियम लागू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रात्री 8 वाजेनंतर आरोपीला लॉकअपमध्ये पाठविण्यात येते. गरज असेल, महत्वाची चौकशी करावीशी वाटली तर आरोपीला रात्री 8 वाजेनंतर चौकशीसाठी बाहेर काढण्यात येते. स्वतंत्र रुममध्ये त्याची चौकशी करण्यात येते. चौकशी अधिकारी (IO) ही चौकशी करतो. चौकशी किती वेळ चालेल, याची शाश्वती नसते. अधिकाऱ्याचे समाधान झाल्यास अथवा उर्वरीत चौकशी दुसऱ्या दिवशी घेण्याचा त्याने निर्णय घेतल्यास आरोपीला लॉकअपमध्ये नेण्यात येते.

CBI च्या लॉकअपमध्ये कोणताही बिछाना, पलंग, बेडची व्यवस्था नाही. आरोपी जमिनीवरच झोपतो.आरोपीला सकाळी 7 वाजता उठवले जाते. त्याला सकाळी 8 वाजता नाश्ता देण्यात येतो. या नाश्त्यात चहा, बिस्कीट, टोस्ट अथवा इतर पदार्थांचा समावेश असतो. 24 तासात त्याची एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. आरोग्य तपासणी करण्यापूर्वी त्याला जेवण देण्यात येते.

सिसोदीया यांच्याविरोधात सीबीआयने कारवाई केली आहे. सीबीआयने 2021-22 मधील अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवला. त्यात सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. एक तासांहून अधिक काळ न्यायालयात सुनावणी सुरु होती. तत्कालीन उपराज्यपालांनी उत्पादन शुल्क धोरणातील बदलांना मान्यता दिल्याचा युक्तीवाद सिसोदिया यांच्या वकिलांनी केला. तरीही केंद्रीय तपास यंत्रणा आप सरकारच्या पाठीमागे हात धुवून लागल्याचा दावा करण्यात आला.

त्यापूर्वी, एका तासाहून अधिक काळ चाललेल्या न्यायालयात सुनावणीदरम्यान, सिसोदिया यांच्या वकिलांनी सांगितले की (तत्कालीन) उपराज्यपालांनी उत्पादन शुल्क धोरणातील बदलांना मान्यता दिली होती, परंतु केंद्रीय तपास यंत्रणा निवडून आलेल्या सरकारच्या मागे आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सीबीआयने सिसोदीया यांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने सिसोदीया यांची 4 मार्चपर्यंत तपास संस्थेच्या कोठडीत रवानगी केली.