
लग्न हे सात जन्मांचं बंधन मानलं जातं, विश्वासावर त्याचा, संसाराचा पाया असतो. पण आजच्या काळात लग्नानंतर विवाहबाह्य संबंध असणे हे खूप सामान्य झाले आहे. भारतात अशी प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. या वर्षी यासंदर्भात आलेल्या अहवालाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या यादीत सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या शहराच्या नावाबद्दल कदाचित कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. विवाहबाह्य संबंधांच्या यादीत दिल्ली किंवा मुंबई नाही तर एक वेगळंच शहर अव्वल स्थानावर आहे.
हे शहर दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये आहे. गेल्या वर्षी या यादीत मुंबई पहिल्या क्रमांकावर होती. पण यावेळी मुंबईचे नाव टॉप 20 यादीतही नाही. दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली-एनसीआरमधील 9 भागांची नावेदेखील या यादीत आहेत.
Ashley Madison या डेटिंग वेबसाइटने जारी केलेल्या अहवालानुसार, कांचीपुरम हे 2024 साली, गेल्या वर्षी 17 व्या स्थानावर होते. पण 2025 मध्ये ते अचानक पहिल्या क्रमांकावर पोहोचले. येथे या वैवाहिक संबंध प्लॅटफॉर्मवर साइन अप करणाऱ्या यूजर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे.
अव्वल स्थानावर कोणती शहरं ?
कायदा काय सांगतो ?
विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये आयपीसीचे कलम 497 हे असंवैधानिक घोषित केले. आणि प्रौढांमधील संमतीने झालेले संबंध गुन्हा मानले जाऊ शकत नाहीत, असे नमूद केले. मात्र, हे संबंध घटस्फोटाचा आधार बनू शकतात. न्यायालयात हे मानसिक क्रूरता म्हणून गणले जाऊ शकते.
तज्ज्ञ काय सांगतात ?
Ashley Madison के चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर पॉल कीएबल सांगतात की, भारतात विवाहबाह्य संबंध आता लपवून ठेवण्याची गोष्ट राहिलेली नाही. येथील लोक नात्यांबद्दल अधिक मोकळेपणाने विचार करू लागले आहेत. हे फक्त शारीरिक संबंधांबद्दल नव्हे तर भावनिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आहे. परंतु विवाहबाह्य संबंधांचा परिणाम केवळ जोडप्यावरच नाही तर मुलांवरही होतो. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो.