मसूदवर निवडणुकीच्या काळातच कारवाई, टायमिंगवर संशय : कमलनाथ

नवी दिल्ली : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून (UNSC) आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने […]

मसूदवर निवडणुकीच्या काळातच कारवाई, टायमिंगवर संशय : कमलनाथ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

नवी दिल्ली : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून (UNSC) आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला होता. पण चीनने तांत्रिक कारण दाखवत आडकाठी केली होती.

मसूद अजहरवर कारवाई नेमकी निवडणुकांच्या काळातच झाली, असं म्हणत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी संशय व्यक्त केलाय. मसूद अजहरवर ही कारवाई यापूर्वीच झाली असती तर चांगलं झालं असतं, आता खुप उशिर झालाय. हे नेमकं निवडणुकीच्या काळातच घडतंय, याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का हे मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली.

देशभरात संयुक्त राष्ट्राकडून केलेल्या कारवाईचं स्वागत केलं जातंय. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. फक्त घोषणा देऊन काही होत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान, जे मोदींसोबत मैत्री दाखवत आहेत, त्यांच्याकडून दाऊद इब्राहिम, मसूद अजहर आणि हाफिज सईद यांना तातडीने भारतात आणावं, अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी दिली.

मसूद अजहरवर आता काय कारवाई?

मसूद अजहर सध्या पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यानंतर त्याला नजरकैदेत ठेवलं असल्याची माहिती आहे. पण त्याला आता इस्लामाबादमधील सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आलंय. यूएनएससीकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाल्यानंतर त्याच्यावर कोणती कारवाई होणार हे स्पष्ट नसलं तरी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणं हीच एक मोठी गोष्ट मानली जाते. कारण, यूएनएससीच्या काही तरतुदी आहेत, ज्यानुसार पुढील कारवाई होते.

यूएनएससीच्या नियमानुसार, मसूद अजहरची संपत्ती तातडीने जप्त केली जाईल. शिवाय त्याचे पैशांचे स्रोतही बंद केले जातील.

संयुक्त राष्ट्राचा सदस्य असलेल्या कोणत्याही देशात मसूद अजहरला जाता येणार नाही.

मसूदला कोणत्याही प्रकारची शस्त्र खरेदी करता येणार नाही. शिवाय त्याच्या संघटनेवर बंदी घातली जाईल. जैश ए मोहम्मदचा भारतातील अनेक हल्ल्यांमध्ये सहभाग आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.