
साप म्हटलं की आपल्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो. सापांबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो. याच गैरसमजामुळे आपन साप दिसला की त्याला मारतो. मात्र यामुळे देशभरातील सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका, त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्प मित्रांना द्या, ते या सापाला पकडून त्याला सुरक्षित अधिवासात सोडतील.
भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग या चार जातींचा प्रामुख्यानं समावेश होतो, या सापांंना आपण बिग फोर असं देखील म्हणतो. जर तुमच्या घराच्या परिसरात अस्वच्छता असेल, उंदिर आणि घूस यांची बिळं असतील तर अशा ठिकाणी अनेकदा साप आपल्या शिकारीच्या शोधात आल्याचं पाहायला मिळतं. मात्र अशा काही वनस्पती असतात, ज्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप या वनस्पतींकडे आकर्षित होतात, त्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.
बांबू – बांबू ही एक अशी वनस्पती आहे, जी उंच वाढते. सर्वात वेगानं वाढणारं गवत अशी या वनस्पतीची ओळख आहे. बांबूची सावली थंड असते. तसेच त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडलेला असतो. त्यामुळे सापांना लपण्यासाठी इथे जागा सापडते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडवा मिळतो, त्यामुळे साप या ठिकाणी आढळून येतात.
चंदन – चंदन हा देखील असाच एक वृक्ष आहे. चंदनाची सावली ही खूप गर्द असते. तसेच या वृक्षाच्या पानाची संख्या देखील प्रचंड असते. या वृक्षाची फळ पक्षांना प्रचंड आवडतात, त्यामुळे पक्षी या झाडावर घरटी निर्माण करतात. या पक्षांना आणि त्यांच्या अंड्यांना खाण्यासाठी साप नेहमी या वृक्षाकडे येतात. तसेच दाट पाणांमुळे त्यांना लपण्यासाठी देखील पुरेशी जागा सापडते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.