राम मंदिरात कधी गेलो नाही अन् जाणारही नाही, TMC खासदार असं का म्हणाले? भाजपवर गंभीर आरोप

आपण कधी राम मंदिरात गेलोच नाही आणि यापुढेही जाणार नाही, असं विधान TMC खासदार कीर्ती आझाद यांनी केलं आहे. कामाख्या देवीच्या पूजेचा उल्लेख करत त्यांनी भाजपला सवाल केला. माता सीतेच्या अग्निपरीक्षेचाही संदर्भ दिला, त्यांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊयात...

राम मंदिरात कधी गेलो नाही अन् जाणारही नाही, TMC खासदार असं का म्हणाले? भाजपवर गंभीर आरोप
Tmc Mp Kirti Azad on Ram mandir
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 3:27 PM

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटर कीर्ती आझाज यांनी ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. धार्मिक राजकारणातून ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी भारतीय जनता पार्टीवर केला आहे. यावेळी त्यांनी आपण कधीही अयोध्येतील राम मंदिरामध्ये गेलेलो नाही आणि यापुढेही कधीही जाणार नाही असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं की त्याऐवजी आपण कामाख्या देवी, सुंदरी मंदीर आणि मथुरेत मात्र आपण जाणार आहोत.

दरम्यान, समावादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी १२ डिसेंबर रोजी अयोध्या दौरा आयोजित केला आहे. त्यांच्या या नियोजित दौऱ्यावरुन भाजपाने त्यांच्यावर टीका केली होती. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अखिलेश यादव १२ डिसेंबर रोजी अयोध्येला भेट देणार आहेत. भाजपने अखिलेश यांच्या या दौऱ्यावर निवडणुकीपुरते ढोंग असे म्हणत टीका केली आहे. त्यासगळ्यावर प्रतिक्रिया देताना आझाद यांनी भाजपावर हल्लाबोल करत त्यांच्या धार्मिक राजकारणावर जोरदार टीका केली.

Loading...

IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना कीर्ती आझाद यांनी म्हटलं की, मला हे कळत नाही की खंडणी आणि दान चोरीत गुंतलेला भारतीय जनता पक्ष राम मंदिराविषयी का बोलत राहतो. मी राम मंदिरात गेलो नाही, मी कामाख्या मंदिरात गेलो आहे. त्यामुळे त्यांना असे म्हणायचे आहे का की, जी व्यक्ती माता कामाख्याची पूजा करते ती हिंदू नसते? मी कामाख्या देवी आणि त्रिपुरा सुंदरी मंदिरांमध्ये जातो, पण मी राम मंदिरात गेलो नाही.

माता सीतेच्या जन्मस्थानाशी आपलं नात असल्याचा दावा करत, कीर्ती आझाद यांनी काही गंभीर प्रश्नही यावेळी उपस्थित केले. कीर्ती आझाद म्हणाले की, मी माता सीतेच्या जन्मभूमीतून आलो आहे. माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली ही परिक्षा पास झाल्यावरही त्यांचा त्याग करण्यात आला. कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीला अशी वागणूक देणे, तिला अग्निपरीक्षा द्यायला लावणे आणि तिने ती पास केल्यावरही तिचा त्याग करणे, हे योग्य आहे का? हे अजिबात योग्य नाही, असं आझाद यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता पुढे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यांनी पुढे असेही म्हटले की, भाजपने देशात रामराज्य नव्हे तर रावणराज्य आणले आहे. राम मंदिराव्यतिरिक्त जनहिताचा कोणताही मुद्दा या पक्षाकडे उरलेला नाही, असंही म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us