ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात अमित शहा; ‘या’ खास प्लॅनमुळे तृणमूलची डोकेदुखी वाढली

| Updated on: Dec 19, 2020 | 2:32 PM

पश्चिम बंगालच्या निवडणुका आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. (Today Amit Shah will from Kolkata to Medinipur, know what his plan)

ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात अमित शहा; या खास प्लॅनमुळे तृणमूलची डोकेदुखी वाढली
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालच्या निवडणुका आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यातच खुद्द शहा यांनीच तळ ठोकला आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात सभा, रोड शो आणि लंच डिप्लोमसीवर शहा यांनी भर दिला आहे. मतदारांना भाजपकडे वळवण्यासाठी शहा यांनी हा खास प्लान तयार केल्याने तृणमूल काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. (Today Amit Shah will from Kolkata to Medinipur, know what his plan)

अमित शहा हे न्यू टाऊन हॉटेलमध्ये उतरले आहेत. या ठिकाणाहून ते ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात प्रचार अभियानाला सुरुवात करणार आहेत. कोलकातापासून ते मेदिनीपूरसह संपूर्ण राज्यात शहा यांच्या दौऱ्यामुळे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज ते संपूर्ण मेदिनीपूर आणि उद्या बीरभूम पिंजून काढणार आहे. त्यानिमित्त्याने प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्वामी विवेकानंद वडिलोपार्जित घरातून सुरुवात

अमित शहा आधी स्वामी विवेकानंद यांच्या शिमला स्ट्रीटवरील वडिलोपार्जित निवासस्थानी जातील. या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून आपल्या प्रचार अभियानास सुरुवात करतील. यावेळी ते मीडियाशी संवादही साधतील. भारतीय संस्कृती आणि बंगालच्या संस्कृतीवर ममता बॅनर्जी यांनी आघात केला असून त्यावर ते बोलण्याची शक्यता आहे.

मेदिनीपूरला हेलिकॉप्टरने येणार

शहा मेदिनीपूरला हेलिकॉप्टरने येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता कोतबाजार येथील माँ सिद्धेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि पूजापाठ करतील. पूजापाठ केल्यानंतर 12 वाजून 5 मिनिटांनी ते शहीद खुदीराम बोस यांच्या आजीच्या घरी जातील. या ठिकाणी खुदीराम बोस यांना अभिवादन करून ते थेट शालबनीला जातील. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता महामाया मंदिरात पोहोचून दर्शन आणि पूजापाठ करतील. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता बालीजुडी गावातील आदिवासी शेतकरी सनातन सिंह यांच्या घरी जाऊन जेवण करतील. या माध्यमातून ते शेतकरी आंदोलनावरही भाष्य करण्याची शक्यता आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमधील मतुआ समुदाय आणि आदिवासी कुटुंबात त्यांनी भोजन केलं होतं.

दुपारी दोन वाजता सभा

त्यानंतर दुपारी 2 वाजता शहा मेदिनीपूरच्या कॉलेज मैदानावर येतील. या ठिकाणी ते एक जनसभेला संबोधित करतील. या सभेसाठी मोठा स्टेज उभारण्यात आला असून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहांची ही सभा ऐतिहासिक होणार असल्याचा दावा भाजप नेते मनोड पांडेय यांनी केला आहे. माजी मंत्री शुभेंदू अधिकारी, आमदार शीलभद्र, माजी खासदार सुनील कुमार मंडल, बानाश्री मंडल सहीत अनेक नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.

उद्या रोड शो

उद्या 20 डिसेंबर रोजी शहा हे बोलपूरला जातील. यावेळी ते विश्व भारती विद्यापीठाचा दौरा करतील. या दौऱ्यात ते एका लोकगायकाच्या घरी जेवण करतील. त्यानंतर रोड शो करून संध्याकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करतील. बंगालच्या दौऱ्यात ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत, त्या ठिकाणीच ते रोड शो करणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यानंतर शहा दिल्लीला रवाना होतील. (Today Amit Shah will from Kolkata to Medinipur, know what his plan)

 

संबंधित बातम्या:

काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते ‘स्पेशल 23’ इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?

आम्ही मान झुकवून-हात जोडून प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रत्येक शेतकऱ्यानं मोदींच्या भाषणातले हे 10 मुद्दे वाचलेच पाहिजे, बघा काय म्हणाले मोदी ?

(Today Amit Shah will from Kolkata to Medinipur, know what his plan)