BREAKING NEWS : उच्च न्यायालयाच्या चार मुख्य न्यायाधीशांसह 10 न्यायाधीशांची बदली, कायदा मंत्रालयाची माहिती

| Updated on: Dec 31, 2020 | 8:26 PM

Transfer of 10 judges including four chief justices of high court

BREAKING NEWS : उच्च न्यायालयाच्या चार मुख्य न्यायाधीशांसह 10 न्यायाधीशांची बदली, कायदा मंत्रालयाची माहिती
Follow us on

नवी दिल्ली : देशभरातील उच्च न्यायालयाच्या 10 न्यायाधीशांची बदली करण्यात आल्याची माहिती कायदा मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये उच्च न्यायालयाच्या चार मुख्य न्यायाधीशांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दोन आठवड्यांपूर्वी न्यायाधीशांच्या बदलीची शिफारस केली होती. त्यानंतर 10 न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे (Transfer of 10 judges including four chief justices of high court).

कोणकोणत्या न्यायाधीशांची बदली?

1. तेलंगना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राघवेंद्र सिंह चौहान यांची उत्तराखंड उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

2. आंध्र प्रद्रेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जेके महेश्वरी यांची सिक्कीमला बदली करण्यात आली आहे.

3. उदिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस मोहम्मद रफीक यांची मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

4. सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुप कुमार गोस्वामी यांची आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

5. मध्यप्रदेशचे न्यायाधीश संजय यादव यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

6. जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजेश बिंदल यांची कोलकाता उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

7. मद्रास न्यायालयाचे न्यायाधीश विनीत कोठारी यांची गुजरात उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

8. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जोयमाल्या बागची यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

9. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांची कर्नाटकला बदली करण्यात आली आहे.

10. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवी विजयकुमार मालीमथ यांची हिमाचल उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे (Transfer of 10 judges including four chief justices of high court).

हेही वाचा : नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात