झाडाने दिलं रिर्टन गिफ्ट; पोराप्रमाणे जपलं, झाड कोसळताच वृद्ध बनला मालामाल, एवढे पैसे की बस मोजता मोजता.., नशीबच फळफळलं

सर्वांना हेवा वाटेल अशी बातमी समोर आली आहे, एक वृद्धाने झाडाला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जपलं, मात्र जेव्हा हे झाडं कोसळलं तेव्हा त्या झाडाने या वृद्धाला चक्क रिर्टन गिफ्ट दिलं आहे. हा वृद्ध मालामाल बनला आहे.

झाडाने दिलं रिर्टन गिफ्ट; पोराप्रमाणे जपलं, झाड कोसळताच वृद्ध बनला मालामाल, एवढे पैसे की बस मोजता मोजता.., नशीबच फळफळलं
Tree gives a return gift
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 07, 2026 | 4:05 PM

सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. परंतु एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. पावसामुळे एक झाड कोसळल्याने एका वृद्धाचं नशीब चमकलं आहे. 85 वर्षांच्या या वृद्धाच्या हाती जॅकपॉट लागला आहे. एखाद्या ठिकाणी झाड कोसळलं तर सामान्यपणे नुकसानच होतं. परंतु घराच्या अंगणामधील झाडं कोसळणं ही त्या वृद्धासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. एन. जी. केसरी यांनी त्यांच्या घराच्या अंगणामध्ये एक चंदनाचं झाडं लावलं होतं. त्यांनी 40 वर्ष या झाडाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपलं.

मात्र अतिमुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे हे झाड कोसळलं, परंतु कोसळताना हे झाडं केसरी यांना श्रीमंत करून गेलं. या झाडाने या वृद्ध व्यक्तीचं आयुष्यच बदलून टाकलं. या झाडाने या वृद्ध व्यक्तीला 28 लाख रुपयांचा मालक बनवलं आहे. एवढंच नाही तर सरकारने त्यांना ‘सँडलूड शिरोमणी’ नावाचा सन्मान देऊन देखील त्यांचा गौरव देखील केला आहे. चाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या घराच्या अंगणामध्ये असंच आपोआप एक चंदनाचं झाड उगवलं होतं. केसरी यांनी या झाडाची देखभाल केली, त्या झाडाला जपलं. चाळीस वर्षांमध्ये हे झाडं प्रचंड मोठं झालं.

दरम्यान या झाडाचा सुगंध आसपासच्या परिसरात देखील पसरू झाला. या चाळीस वर्षांच्या काळात अनेकदा हे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न देखील झाला. चंदन तस्करांची नजर कायम या झाडावर होती. मात्र केसरी यांनी चंदन तस्करांपासून या झाडाचं कायम संरक्षण केलं. या झाडाभोवती त्यांनी मजबूत लोखंडाचं कंपाउड तयार केलं होतं. परंतु प्रचंड पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हे झाड कोसळलं. हे झाडं कोसळल्यानंतर केसरी यांनी नियमानुसार याची माहिती वन विभागाला दिली, वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर या झाडाला मैसूर येथील सरकारी चंदन डोपोमध्ये पाठवण्यात आलं. या झाडापासून तब्बल 1 टन चंदन मिळालं, याचा मोबदला म्हणून सरकारने केसरी यांना 28 लाख रुपये दिले, एवढंच नाही तर त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आलं.

 

Follow Us