Tukaram Mundhe: हीच मोठी शोकांतिका…तुकाराम मुंढे गुजरातमध्ये पोहोचताच असं का म्हणाले?

Tukaram Mundhe FDA Actios: तुकाराम मुंढे यांच्याकडे आयुक्तपद आल्यापासून अनेक कारवाया करण्यात झाल्या आहेत. आता तुकाराम मुंढे यांनी गुजरातमधील कार्यक्रमात एक विधान केले ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Tukaram Mundhe: हीच मोठी शोकांतिका...तुकाराम मुंढे गुजरातमध्ये पोहोचताच असं का म्हणाले?
| Updated on: Sep 28, 2026 | 7:33 AM

Tukaram Mundhe FDA: महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) अन्न व्यवसायांवर आणि भेसळखोरांवर सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाईचे तुकाराम मुंढे यांनी ठामपणे समर्थन दर्शवले आहे. “अन्न सुरक्षेचे कडक नियम आणि कायदे देशात आधीपासूनच होते पण मात्र त्यांचे होत नव्हते हीच तर सर्वात मोठी शोकांतिका आहे,” अशा शब्दांत त्यांनी थेट व्यथा मांडली आहे.

गांधीनगरच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

गुजरातच्या गांधीनगरमध्ये एका कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली होती, या कार्यक्रमात तुकाराम यांनी बोलताना स्पष्ट केले की, “अन्न सुरक्षेची ही मोहीम कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा हॉटेल व्यावसायिकाला वैयक्तिक लक्ष्य करण्यासाठी नसतेच, तर थेट सार्वजनिक आरोग्य आणि कायद्याच्या पालनासाठी राबवली जाते.” गांधीनगरमधील कार्यक्रमात तुकाराम मुंढे म्हणाले, “अन्न सुरक्षेशी संबंधित सर्वात मोठी अडचण ही आहे की, जे कठोर नियम आधीपासून अस्तित्वात होते, त्यांचे गांभीर्याने पालनच केले जात नव्हते. अशुद्ध आणि निकृष्ट अन्नपदार्थांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय.”

देशातील बदलत्या आजारांच्या स्वरूपावर चिंता व्यक्त करताना मुंढे म्हणाले, “आज समाजात डायबिटीस, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण झटपट वाढत आहे. या जीवनशैलीविषयक आजारांचा आणि आपण रोज काय खातो-पितो याच्याशी थेट संबंध आहे.” स्वातंत्र्याच्या वेळी देशात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण ६५ ते ७० टक्के इतकेच होते. मात्र आज बिगर-संसर्गजन्य आजारांचे प्रमाण एवढे इतके वाढले आहे की लोक आजारांवर उपचार घेत आहे, पण आपण काय खातो-पितो याचा या आजारांशी खोल संबंध किती आहे याकडे अगदी दुर्लक्ष करतात, असेही त्यांनी आर्वजून बोलून दाखवले.

मे महिन्यात तुकाराम मुंढे यांनी एफडीए (FDA) आयुक्तपदभार स्वीकारल्यापासून राज्यात अन्न सुरक्षेबाबत कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. अस्वच्छता, कीटक आणि भेसळीचे प्रमाण आढळल्यास थेट परवाने रद्द केले गेले. अनेक सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. अनेकांनी त्यांच्या कामगिरीचे भरभरुन कौतुक केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us