जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद

| Updated on: Dec 10, 2021 | 9:55 PM

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यावेळी अतिरेक्यांनी पोलीस पार्टीवर निशाणा साधला आहे.

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद
Terrorists attack
Follow us on

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यावेळी अतिरेक्यांनी पोलीस पार्टीवर निशाणा साधला आहे. दहशतवाद्यांनी पोलीस पार्टीवर केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत. आज दुपारी बांदीपोरा येथील गुलशन चौकात ही घटना घडली.

इन्स्पेक्टर जनरल विजय कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गोळी लागली. मोहम्मद सुल्तान आणि फयाज अहमद असं या दोन शहीद पोलिसांची नावे आहेत. यातील एकजण पीएसओ होता तर एक जण ड्रायव्हर होता. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई देणार असल्याचं पोलीस दलाकडून सांगण्यात आलं.

सर्च ऑपरेशन सुरू

बांदीपोरात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला. या परिसरात पोलीस आणि जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. दरम्यान हा हल्ला कोणी केला? दहशतवादी कारवाई करण्यासाठी किती अतिरेकी आले होते? याची कोणतीही माहिती समोर आली नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले सुरूच

केंद्र सरकारने नुकतीच जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांची माहिती दिली होती. केंद्राच्या मते गेल्या ती वर्षात जम्मू काश्मीरमध्ये 1033 हल्ले झाले. यातील सर्वाधिक 594 घटना 2019मध्ये झाल्या आहेत. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लेखी निवेदनाद्वारे ही माहिती राज्यसभेत दिली. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरात 244 हल्ले झाले आहेत. तर या वर्षी 15 नोव्हेंबरपर्यंत 196 घटना घडल्या आहेत.

 

संबंधित बातम्या:

Tirupati Temple | नवस पूर्ण झाल्याने तिरुपती मंदिरात भक्ताने दान केले तीन कोटींचे सोन्याचे दागिने

Uttar pradesh : योगींनी घेतली विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहानांच्या कुटुंबियांची भेट, योगींकडून मदत जाहीर

Uttar pradesh : उत्तर प्रदेशात सर्वात जास्त मानवी हक्काचं उल्लंघन, गृहमंत्रालायाकडून आकडेवारी जाहीर