AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tirupati Temple | नवस पूर्ण झाल्याने तिरुपती मंदिरात भक्ताने दान केले तीन कोटींचे सोन्याचे दागिने

कोरोना काळात थंगादुराई यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आपण लवकर बरे व्हावे यासाठी त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरात नवस केला होता. तो नवस आता पूर्ण झाला आहे. मंदिरातील प्रमुख देवता व्यंकटेश्वराच्या तळहातांना सुशोभित करण्यासाठी सोन्याचे शंख आणि चक्र भक्ताकडून दान करण्यात आले.

Tirupati Temple | नवस पूर्ण झाल्याने तिरुपती मंदिरात भक्ताने दान केले तीन कोटींचे सोन्याचे दागिने
नवस पूर्ण झाल्याने तिरुपती मंदिरात भक्ताने दान केले तीन कोटींचे सोन्याचे दागिने
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 8:44 PM
Share

आंध्र प्रदेश : नवस पूर्ण झाल्याबद्दल एका भक्ताने आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानाला 6 किलो सोने दान केले आहे. मंदिरातील प्रमुख देवता व्यंकटेश्वराच्या तळहातांना सुशोभित करण्यासाठी सोन्याचे शंख आणि चक्र भक्ताकडून दान करण्यात आले. थंगादुराई असे दान करणाऱ्या भक्ताचे नाव असून ते चेन्नईच्या थेनी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. थंगादुराई यांनी आपल्या आरोग्यासाठी तिरुपती मंदिरात नवस केला होता. नवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी मंदिरात सोने दान दिले.

कोरोनातून बरे होण्यासाठी केला होता नवस

कोरोना काळात थंगादुराई यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आपण लवकर बरे व्हावे यासाठी त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरात नवस केला होता. तो नवस आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे थंगादुराई यांनी भगवान व्यंकटेश्वराची पूजा केल्यानंतर, 3.5 किलो वजनाचे सोन्याचे शंख (शंख) आणि चक्र (चक्र) मंदिरात दान म्हणून मंदिर अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सुपूर्द केले. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए.के. व्यंकट धर्मा रेड्डी यांच्याकडे सोने सुपूर्द करण्यात आले.

भगवान व्यंकटेश्वराला सोन्याचे दागिने घालते जाणार

हे सोन्याचे दागिने भगवान व्यंकटेश्वराला घातले जातील, असे मंदिरातील अधिकाऱ्यांनी सांगितले. थंगादुराई गेल्या 50 वर्षांपासून तिरुमला मंदिरात भगवान व्यंकटेश्वराची पूजा करत आहेत. थंगादुराई यांनी सांगितले की, गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे मंदिरात भाविकांच्या येण्यावर आणि दर्शनावर बंदी घालण्यात आली होती, तसेच त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरात नवस केला होता, जो पूर्ण झाला आहे. ते कोरोनामधून बरे झाले आहेत.

दरवर्षी लाखो भाविक येतात

तिरुमला डोंगरावर वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो लोक भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. हे भारतातील अशा मंदिरांपैकी एक आहे ज्यांचे दरवाजे सर्व धर्मांच्या अनुयायांसाठी खुले आहेत. तिरुपती मंदिरात अनेकदा सोन्याचा प्रसाद चढवला जातो. त्यामुळेच हे मंदिर देणगीच्या बाबतीत भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. (Devotees donate gold jewelery worth Rs 3 crore at Tirupati temple)

इतर बातम्या

केदारनाथ ते काश्मीर, ज्या MI 17 मुळे रावतांना जीव गमवावा लागला ते शत्रूचा कर्दनकाळ आहे हे माहितीय?

Omicron : बाप रे! राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले, मुंबईत 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 रुग्ण सापडल्याने टेन्शन वाढलं

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.