कुत्र्यासाठी दोन बहिणींनी स्वतःला संपवलं… तुम्ही म्हणाल हे काय? पण वास्तव अत्यंत भयानक

कुत्र्यासाठी दोन सख्या बहिणींनी स्वतःलाच संपवलं..., वाचून थोडं वेगळं वाटेल... पण सत्य घटना समजल्यानंतर डोळ्यात पाणी, आईला सांगितलेले ते काही शब्द आणि...

कुत्र्यासाठी दोन बहिणींनी स्वतःला संपवलं... तुम्ही म्हणाल हे काय? पण वास्तव अत्यंत भयानक
| Updated on: Dec 26, 2025 | 12:05 PM

दोन सख्या बहिणींनी पाळीव कुत्र्यासाठी स्वतःला संपवलं… हे वाचून तुम्ही देखील म्हणाल हे काय आहे? पण ही सत्य घटना आहे. राधा (24) आणि जिया (22) या दोन बहिणींनी स्वतःला संपवलं आहे… ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे… आपण पाहतो आपल्या भोवती अनेक प्राणीप्रेमी असतात. पण एखाद्या प्राण्यासाठी कोणी आत्महत्या करेल.. असं तुम्ही देखील कधी ऐकलं नसेल.. दोन बहिणींनी आत्महत्या तर केलीच पण सत्य मात्र फार वेगळं आहे… बहिणींच्या मृत्यूचं कारण फक्त पाळीव कुत्रा नव्हता… तर वास्तव अत्यंत भयानक आहे… हे सत्य पाळीव कुत्रा टोनी याच्या आजारपणापासून सुरु झालं नाव्हतं…

गेल्या काही वर्षांपासून कुटुंबावर दुःखाचं सावट होतं. गेल्या सहा महिन्यांपासून बहिणींचे वडील आजारी होते… जे कधीकाळी कुटुंबाचा आधार होते आणि वडिलांनी काही जरी झालं तरी सर्वांत जास्त दुःख मुलींना होतं.. हे याठिकाणी स्पष्ट दिसत आहे… वडिलांचं आजारपण… औषधं… हॉस्पिटल… खर्च आणि भविष्याची काळजी यासर्व गोष्टींमुळे तणावात असलेल्या मुलींनी अखेर टोकाचं पाऊन उचललं… सपूर्ण घराची जबाबदारी दोनींच्या खांद्यावर होती… हे सत्य त्या कोणाला सांगू देखील शकल्या नाही…

यापूर्वी देखील कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता… सात वर्षांपूर्वी लहान भावाचं ब्रेन हेमरेजमुळे निधन झालं होतं. राधा आणि जिया यांचं त्यांच्या भावावर प्रचंड प्रेम करत होतं… पण भावाच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला… यामध्ये त्यांचा पाळीव कुत्रा टोनी देखील त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचा होता… जो काही न बोलता दोन्ही बहिणींचं दुःख समजून घेत होता… आता टोनीच त्यांच्या आयुष्याचा भक्कम आधार होता…

पण टोनी देखील आजारी पडल्यानंतर राधा आणि जिया या दोन बहिणींना मोठा धक्का बसला… पाळीव कुत्र्याची अवस्था… वडिलांचं आजारपण… भावाचं निधन… या सर्व कारणांमुळे राधा आणि जिया फिनायल प्यायल्या… त्यानंतर दोघींची प्रकृती खालावली… अशात त्यांनी आईला सांगितलं, ‘आम्ही दोघींना फिनायल प्यायलं आहे… आता आम्ही वाचणार नाही… आमच्या टोनीला घरातून बाहेर काढू नकोस… त्याला वेळेत औषध देत जा…’ या घटनेनंतर परिसरातील सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं.. लखनऊ याठिकाणी ही घटना घडली आहे.