
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळीच ते दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेन्स यांचं स्वागत केलं. आपल्या चार दिवसाच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी वेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी भारत-अमेरिका दरम्यानच्या द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती वेन्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारामधील प्रगतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच, दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे, विशेषतः ऊर्जा, संरक्षण आणि टॅक्टिकल टेक्नोलॉजीसारख्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना शुभेच्छा दिल्या असून, वर्षाच्या अखेरीस त्यांच्या भारत भेटीची प्रतिक्षा असल्याचे सांगितले.
Pleased to welcome US @VP @JDVance and his family in New Delhi. We reviewed the fast-paced progress following my visit to the US and meeting with President Trump. We are committed to mutually beneficial cooperation, including in trade, technology, defence, energy and… pic.twitter.com/LRNmodIZLB
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2025
उपाध्यक्ष वेन्स आणि त्यांचे कुटुंब सध्या 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. 2013 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्या भारत भेटीनंतर हे अमेरिकेचे पहिले उपराष्ट्रपती आहेत जे भारतात आले आहेत. ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा अध्यक्ष ट्रंप यांनी भारतासह इतर देशांवर लावण्यात आलेले व्यापक आयात शुल्क तात्पुरते स्थगित केले आहेत.
US Vice President JD Vance
भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात शुल्क, व्यापार संतुलन आणि बाजारात प्रवेश या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. या भेटीदरम्यान उपाध्यक्ष वेन्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जयपूर व आग्रा या शहरांना भेट देण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे ही भेट केवळ धोरणात्मकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरत आहे.
US Vice President JD Vance
आजच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी उपाध्यक्ष वेन्स, त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा चिलुकुरी वेन्स आणि अमेरिकन प्रतिनिधी मंडळाच्या सन्मानार्थ रात्रभोजनाचे आयोजन केले. अमेरिका सध्या भारतावर त्यांच्या तेल, वायू आणि संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी दबाव टाकत आहे, ज्यामुळे सुमारे 45 अब्ज डॉलर्सचा व्यापार तुटीचा फरक भरून काढता येईल. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे सहायक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी भारत भेट देऊन बीटीएबाबत भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
US Vice President JD Vance