कोरोनाचं तांडव सुरुच, भाजपच्या तिसऱ्या आमदाराचं निधन

उत्तर प्रदेशातील भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचं कोरोनानं निधन झालं आहे. Kesar Singh Gangwar died due to corona

कोरोनाचं तांडव सुरुच, भाजपच्या तिसऱ्या आमदाराचं निधन
Kesar Singh Gangwar
| Updated on: Apr 28, 2021 | 7:04 PM

लखनऊ: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशला देखील कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचं कोरोनानं निधन झालं आहे. केसर सिंह गंगवार हे नवाबगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. कोरोनानं निधन झालेले यूपीमधील भाजपचे तिसरे आमदार आहेत. (UP BJP MLA Kesar Singh Gangwar died due to corona virus)

दुसऱ्या लाटेत भाजपच्या तिसऱ्या आमदाराचं कोरोनानं निधन

केसर सिंह गंगवार यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, त्यांचं कोरोना विषाणू संसर्गामुळं निधन झालं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन होणारे केसर सिंह गंगवार भाजपचे तिसरे आमदार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंगवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

योगी आदित्यनाथ यांचं ट्विट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केसर सिंह गंगवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. तर, भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी देखील गंगवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी देखील केशर सिंह गंगवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

कोरोनानं भाजपच्या तीन आमदारांचं निधन

कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर आतापर्यंत भाजपच्या तीन आमदारांचं निधन झालं आहे. यामध्ये केशर सिंह गंगवार, औरेयाचे भाजप आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचं कोरोनानं निधन झालं होतं.

इतर बातम्या:

महाराष्ट्रात जे झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं, जावडेकरांची टीका; शिवसेना म्हणाली…

शिवसेनेत गेलेल्या माजी आमदाराला भाजपची साद

पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरात चोरी, आमदार माधुरी मिसाळ यांच्या जाऊबाईंचे 18 लाखांचे दागिने लंपास

(UP BJP MLA Kesar Singh Gangwar died due to corona virus)