AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेत गेलेल्या माजी आमदाराला भाजपची साद

नाशिकचे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनाही परत पक्षात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

शिवसेनेत गेलेल्या माजी आमदाराला भाजपची साद
| Updated on: Dec 10, 2020 | 7:52 AM
Share

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप कंबर कसताना दिसत आहे. शिवसेनेचा झेंडा हाती धरलेले माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांना पक्षात परत बोलवण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरु केली आहे. भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना असा प्रवास केलेले सानप भाजपच्या हाकेला कसा प्रतिसाद देणार याची उत्सुकता आहे. (BJP call back former MLA Balasaheb Sanap in Shivsena)

एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड असे दिग्गज नेते भाजप सोडून गेले असताना पक्ष आता “या चिमण्यांनो परत फिरा” अशी साद घालताना दिसत आहे. जुन्या-जाणत्या आणि पक्ष सोडून गेलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांना साद घालण्याची प्रक्रिया भाजपने सुरु केली आहे. नाशिकचे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनाही परत पक्षात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

कोण आहेत बाळासाहेब सानप?

बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर ठरले होते. 2014 मध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर सानप यांना विजय मिळाला होता.

‘विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपण अपक्ष नगरसेवक पवन पवारची भेट घेतली व मदत करण्याची गळ घातली. पवन पवारने आपल्याला निवडणुकीत मदत केली असून, माझ्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे’ अशी मुक्ताफळं बाळासाहेब सानप यांनी 2014 मधील विजयानंतर उधळली होती.

भाजपने तिकीट नाकारलं 

बाळासाहेब सानप 2014 मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले, मात्र विद्यमान आमदार असूनही सानप यांना भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं होतं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पवन पवारमुळेच आपण निवडून आल्याचा खुलासा सानप यांनी केल्याने त्यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. या कारणानेच त्यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा होती.

भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश

सानप यांच्याऐवजी मनसेमधून आलेल्या राहुल ढिकले यांना भाजपने तिकीट दिलं होतं. राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आहेत. तिकीट डावलल्याने नाराज झालेल्या सानप यांनी भाजपला अलविदा करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता. नाशिक पूर्व मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. विशेष म्हणजे मनसेतून बाहेर पडलेल्या ढिकलेंना पाडण्यासाठी मनसेने या ठिकाणी उमेदवार न देता सानप यांना पाठिंबा दिला होता. (BJP call back former MLA Balasaheb Sanap in Shivsena)

विधानसभेला पराभव, शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीत मात्र राहुल ढिकलेंकडून सानप यांना 12 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकत सानप यांनी शिवसेनेची वाट धरली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बाळासाहेब सानप यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुखांकडून शिवबंधन बांधून घेतलं होतं. एका महिन्याच्या कालावधीत सानप यांचा तीन पक्षांमध्ये प्रवास झाला होता.

एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आगामी निवडणुकांना एकत्रित ताकदीने सामोरं जाण्याचा निश्चय केला आहे, तर भाजपही पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर उतरण्याच्या त्वेषात आहे. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात असे. त्यामुळे निवडणुकांमध्ये भाजप-मनसे एकत्र येणार का, याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नाशिकचा गड जिंकण्यासाठी भाजप साम-दाम-दंड-भेद वापरणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीच्या तिकीटावर पराभूत भाजपचा माजी आमदार शिवसेनेत

भाजपच्या 14 नगरसेवकांचा राजीनामा, बाळासाहेब सानपांसाठी कार्यकर्ते आक्रमक

(BJP call back former MLA Balasaheb Sanap in Shivsena)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.