AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या 14 नगरसेवकांचा राजीनामा, बाळासाहेब सानपांसाठी कार्यकर्ते आक्रमक

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपल्या उमेदवारांची यादी (BJP Candidate List) जाहीर केल्यानंतर अनेक विद्यमान आमदारांच्या हाती निराशा आली आहे.

भाजपच्या 14 नगरसेवकांचा राजीनामा, बाळासाहेब सानपांसाठी कार्यकर्ते आक्रमक
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 02, 2019 | 9:17 PM
Share

नाशिक: भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपल्या उमेदवारांची यादी (BJP Candidate List) जाहीर केल्यानंतर अनेक विद्यमान आमदारांच्या हाती निराशा आली आहे. उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर अनेक आमदारांची नावेच नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचीच प्रचिती नाशिकमध्येही येत आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातून (Nashik East Constituency) विद्यमान आमदार बाळासाहेब सानप (MLA Balasaheb Sanap) यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने भाजपच्या 14 नगरसेवकांची राजीनामा (BJP Corporator Resign) दिला आहे.

राजीनामा देणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी याच्या निषेधार्थ आपले राजीनामे दिले. सानप यांची उमेदवारी रद्द झाल्याच्या चर्चेनंतर सानप यांच्या कार्यालयात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या भावनाही अनावर झाल्या. अनेक महिलांनी सानप यांच्या कार्यालयात थेट रडण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला.

भाजपच्या पहिल्या यादीत अनेक आमदारांच्या नावांना डच्चू मिळाला आहे. त्यामुळे किमान दुसऱ्या यादीत आपलं नाव यावं म्हणून अनेक इच्छुक भाजप नेत्यांकडं तळ ठोकून आहेत. काहींनी आपल्या मतदारसंघातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरू केलं आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपनं उमेदवारी जाहीर न केल्यानं विद्यमान आमदार बाळासाहेब सानप देखील अस्वस्थ झाले आहेत. सानप यांच्या निवासस्थानी नाशिकच्या पंचवटी आणि त्रंबकेश्वर येथील भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला. सानप यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आलं. बाळासाहेब सानपही यावेळी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक बोलत असताना सानप यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. यावेळी भावुक झालेल्या सानप यांनी पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

मला तिकीट नाही असं पालकमंत्री किंवा भाजप नेत्यांपैकी कुणी तोंडीही सांगितलं नाही, असं सांगत सानप अस्वस्थ झाले. भाजपने पक्षातील विद्यमान आमदाराला डच्चू देत मनसेतून आलेल्या नेत्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नाशिक भाजपमध्ये बंडखोरी होणार की बंड शमणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?