'या' कारणामुळे सोनिया गांधी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर नाराज?

नवी दिल्ली : काँग्रेसने काल राजधानी दिल्लीत विविध घोषणांसह लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यातील काही घोषणांनी जनतेचं लक्ष वेधून घेतलं, तर जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार नाही या आश्वासनामुळे टीकाही झाली. पण काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि यूपीएच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर नाराज असल्याचं कळतंय. त्यांच्या नाराजीचं कारण जरा वेगळं आहे. सोनिया …

'या' कारणामुळे सोनिया गांधी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर नाराज?

नवी दिल्ली : काँग्रेसने काल राजधानी दिल्लीत विविध घोषणांसह लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यातील काही घोषणांनी जनतेचं लक्ष वेधून घेतलं, तर जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार नाही या आश्वासनामुळे टीकाही झाली. पण काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि यूपीएच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर नाराज असल्याचं कळतंय. त्यांच्या नाराजीचं कारण जरा वेगळं आहे.

सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य राजीव गौडा यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. काँग्रेस जाहीरनाम्याच्या मुख्यपृष्ठावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो अत्यंत लहान आकारात लावण्यात आलाय. तो आणखी मोठा आकाराचा हवा होता, असं सोनिया गांधींचं म्हणणं असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेसचा जाहीरनामा राष्ट्रीय सुरक्षेला धोका : भाजप

काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहिरनाम्यातील काही मुद्द्यांवर भाजपने तीव्र आक्षेप घेतलाय. काँग्रेसने देशद्रोहाला गुन्हेगारी चौकटीतून बाहेर आणण्याचं आश्वासन दिलंय, शिवाय सीआरपीसी (The Code of Criminal Procedure) (CrPC ) मध्ये बदल करण्याचीही ग्वाही दिलीय, ज्यामुळे जामीन घेण्याचा प्रत्येकाला अधिकार मिळेल. दहशतवादीही यामुळे जामीन मिळवू शकतील आणि महिलांवर अन्याय करुन आरोपी जामिनावर मोकाटपणे फिरतील, असं भाजपने म्हटलंय.

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर मुद्दा आणि विविध आश्वासनांवर आक्षेप घेतला. काँग्रेसची काही आश्वासने ही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रत्येकाला जामीन देण्याचा अधिकार देणाराला एकही मत घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघात अरुण जेटलींनी केलाय. शिवाय काश्मीरप्रश्नी काँग्रेसने काश्मिरी पंडितांचा किमान औपचारिकता म्हणून तरी उल्लेख करायचा, असंही ते म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *