AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक व्यक्तीचा उद्धार…11 वर्षात पीएम मोदी यांनी या 12 कामांद्वारे नव्या भारताची मुहूर्तमेढ रोवली

मोदी सरकारच्या 11 वर्षात भारतातील गरीबीत अभूतपूर्व कमी आली आहे. नळाचे पाणी, वीज, शौचालय सारख्या पायाभूत सुविधा कोट्यवधी लोकांना मिळाली आहे. IMF आणि UNDP चे आकडे गरीबीत कमी झाल्याचे स्पष्ट करीत आहे. अंत्यतिक गरीबीत कमी आणि बहुआयामी गरीबी निर्देशांकात घसरण झाल्याचे हे दर्शवत आहे.

प्रत्येक व्यक्तीचा उद्धार...11 वर्षात पीएम मोदी यांनी या 12 कामांद्वारे नव्या भारताची मुहूर्तमेढ रोवली
| Updated on: Jun 09, 2025 | 4:06 PM
Share

नरेंद्र मोदी सरकारची सोमवारी ९ जून रोजी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलत आहे आणि वेगाने हा बदलत आहे. लोकांचा आत्मविश्वास, सरकारवरील त्यांचा विश्वास आणि नव्या भारताच्या खुणा जागोजागी दिसत आहेत. साल २०१४ पासून भारताच्या कल्याणकारी योजना अंत्योदय, देशाच्या प्रत्येक व्यक्तीचे उत्थान आणि विकास निश्चित करण्याचा सिद्धांत निर्देशित करीत आहे. या तत्वज्ञानाने समावेशक सक्षमीकरणाचा एक आदर्श बदल घडवून आणला आहे, सरकारने प्रत्येक प्रमुख योजनेत १०० टक्के समृद्धतेचे लक्ष्य ठेवले आहे.

गेल्या ११ वर्षात कोट्यवधी वंचित कुटुंबाना पहिल्यांदा नळाचे पाणी, वीज, शौचालय, निवास, आरोग्यसेवा , स्वच्छ जेवण बनवण्याचे इंधन, विमा आणि डिजिटल सेवा सारख्या गरजेच्या सुविधा मिळाल्या आहेत. या लक्षित समावेशी प्रयत्नांना मोजण्यायोग्य परिणाम मिळाले आहेत. अलिकडेच आयएमएफच्या एका अहवालात भारताच्या अत्यंतिक गरीबीला प्रभावी पद्धतीने संपवण्याचे श्रेय भारत सरकारला दिले आहे.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) द्वारा जारी 2023 वैश्विक बहुआयामी गरीबी निर्देशांकाने (एमपीआय) भारतात बहुआयामी गरीबी च्या 10 संकेतामध्ये उल्लेखनीय घसरण झाली आहे.ही उपलब्धता सरकारच्या एका नव्या युगाचा संकेत देत आहे, जे समानतेवर आधारित आहे, आकड्यांद्वारा हे सिद्ध झाले आहे की प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याचा संकल्प केलेला आहे.

गरीबीपासून लढण्यासाठी भारताचा विजय

भारताने गरीबीच्या विरुद्ध आपल्या युद्धात महत्वपूर्ण विजय मिळवला आहे,सर्वात कमजोर लोकांपर्यंत विकासाची गंगा पोहचवण्याचा दृढ संकल्प सरकारने केला आहे.

वर्ल्ड बँकेच्या स्प्रिंग – 2025 गरीबी आणि समानता ब्रीफनुसार, देशाने गेल्या दशकांत 171 दशलक्ष लोकांना अंत्यतिक गरीबीतून बाहेर काढले आहे. प्रतिदिन 2.15 डॉलरहून कमी पैशात जीवनाची गुजराण करणाऱ्या लोकसंख्येचा स्तर वेगाने घसरत आहे. जो 2011-12 मध्ये 16.2% ते 2022-23 मध्ये केवल 2.3% टक्के राहीला आहे.

निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी प्रतिदिन 3.65 डॉलरचे बेंचमार्कवर, गरीबी 61.8% कमी होऊन 28.1% झाली आहे, याचा अर्थ असा की 378 दशलक्ष लोक या स्तराच्या वर गेले आहेत. याशिवाय भारतचा बहुआयामी गरीबी निर्देशांक (एमपीआय), जो आरोग्य, शिक्षण आणि जीवन स्तरासहित उत्पनाच्यावरचा विचार करतो.

2005-06 मध्ये 53.8% ने घटून 2019-21 मध्ये 16.4% झाला आहे. हा लाखो लोकांचे जीवनस्तराच्या रूपांतरणाला दर्शवतो.आणि गरीबी आणि दुर्लक्षित लोकांची सेवा करण्याच्या भारत मिशनचा एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारने केलेली मोठे काम

15.59 कोटी ग्रामीण घरात आता नळाच्या पाण्याचे कनेक्शन आहे. 8 राज्यांत आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत 100% हर घर जल योजना पोहचली…

सुमारे 4 कोटी घरे बांधून पूर्ण झाली आहेत. पीएमएवाय-यू.के. अंतर्गत 92.35 लाख घरं सोपविली जाणार आहेत, ज्यात 90 लाखांहून अधिक घरे महिलांकडे आहेत.

सौभाग्य योजनेंतर्गत 2.86 कोटी घरात वीज पोहचली आहे,ग्रामीण विभागात सरासरी 22.6 तास वीज पुरवठा होतो आहे.

स्वच्छ भारत मिशन: 12 कोटी घरगुती शौचालये बांधली आहेत, 5.64 लाख गावांना ओडीएफ प्लस घोषीत केले आहे.

आयुष्मान भारत : 55 कोटी लोकांना कव्हर करते, आयुष्मान वय वंदना अंतर्गत 70+ आयु वर्गाच्या सर्व नागरिकांना लाभ मिळणार आहे.

81 कोटी लाभार्थ्यांना मुफ्त राशन, 2028 पर्यंत 11.80 लाख कोटी रुपयांचा खर्च

पीएम उज्ज्वला योजना अंतर्गत 10.33 कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन दिले आहेत.

पीएम स्वनिधी अंतर्गत स्ट्रीट वेंडर्सना 68 लाख कर्ज; 76.28 लाख विक्रेत्यांना औपचारिक रूपाने दिले आहे.

1.57 लाख स्टार्टअपना मान्यता दिली आहे; 118 यूनिकॉर्न.

पीएम विश्वकर्मांतर्गत 2.37 मिलियन कारीगर नोंदणीकृत झाले आहेत.

ई-श्रम पोर्टल: 30.86 कोटी असंघटीत श्रमिक पंजीकृत, 53.75% महिलांची नोंदणी

कल्याणकारी योजना लाभार्ध्यांपर्यंत 100 टक्के लाभ देण्याचा संकल्प केला आहे, विकसित भारत संकल्प यात्रा 2.6 लाख ग्राम पंचायती, 4,000 यूएलबीपर्यंत पोहचली आहे

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.