मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक, ऑक्सिजन लेवल खालावली… मोदींचा अखिलेशना फोन…

| Updated on: Oct 03, 2022 | 10:24 AM

मुलायम सिंहांवर अँकोलॉजिस्ट डॉ. नितीन सूद आणि डॉ. सुशील कटरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. 22 ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुलै महिन्यातही त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं.

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक, ऑक्सिजन लेवल खालावली... मोदींचा अखिलेशना फोन...
Image Credit source: social media
Follow us on

लखनौः उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Sigh Yadav) यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात  उपचार घेत आहेत. कर्करोग तज्ज्ञ डॉ. नितीन सूद यांच्या देखरेखीखाली यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. रविवारी संध्याकाळी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं सांगण्यात आलं मात्र रात्रीतून त्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्यांची ऑक्सिजन (Oxygen) लेवल कमी झाली असून सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.

दरम्यान, मुलायम सिंह यांच्याजवळ त्यांचे पुत्र अखिलेश यादव आहे. अखिलेश यादव, अपर्णा यादव हे रुग्णालयात आहेत. तर मुलायम सिंहांचे दुसरे पुत्र प्रतीक यादव हेदेखील आधीपासूनच दिल्लीत रुग्णालयात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांना फोन करून मुलायम सिंह यांच्या तब्येतीविषयी चौकशी केल्याचं वृत्त आहे. तत्पूर्वी काल संध्याकाळी समाजवादी पक्षाचे राकेश यादव यांनीही मुलायम सिंहांविषयी चौकशी केली.

सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, मुलायम सिंहांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य गुरुग्रामला येत आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांनी गुरुग्राममध्ये गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलायम सिंहांवर अँकोलॉजिस्ट डॉ. नितीन सूद आणि डॉ. सुशील कटरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. 22 ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुलै महिन्यातही त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं.