AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेवडा नवरा नकोच… तीन फेरे घेतले आणि तिने उचललं टोकाचं पाऊल; ‘त्या’ लग्नात असं काय घडलं?

लग्नाचे विधी सुरू होते, सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत वर-वधू सप्तपदी घेत होते. मात्र तीन फेरे होताच अचानक वधूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. होणारा नवरा दारू पितो आणि त्याने हुंड्याचीही मागणी केल्याचे सांगत वधूने भर मांडवात लग्न मोडलं.

बेवडा नवरा नकोच... तीन फेरे घेतले आणि तिने उचललं टोकाचं पाऊल; 'त्या' लग्नात असं काय घडलं?
| Updated on: Nov 25, 2023 | 12:25 PM
Share

लखनऊ | 25 नोव्हेंबर 2023 : लग्नाचे विधी सुरू होते, सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत वर-वधू सप्तपदी घेत होते. मात्र तीन फेरे होताच अचानक वधूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. थांबा…. मी हे लग्न कधीच करणार नाही असे तिने जाहीर केले. अचानक आलेल्या या ट्वि्स्टमुळे सगळेच चक्रावले. पण वधू तिच्या निर्णयावर ठाम राहिली. असं का करत्येस, सगळं छान आहे, व्यवस्थित पार पडतयं, चल लग्नाला अस सांगत नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रय्तन केला. मात्र ‘मी दारूड्या माणसाशी लग्न कधीच करणार नाही ‘ असे सांगत तिने भर मंडपात हे लग्न मोडलं. मंडपातही तो नवरा मुलगा नशेतच होता. अखेर सर्वांनीच तिचा निर्णय मान्य केला आणि वधूनला न घेताच वऱ्हाडी घरी परतले.

एखाद्या चित्रपटाचा किंवा टीव्ही मालिकेचा सीन शोभावा, अशी ही घटना खरोखर घडली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. तिथे एका युवतीने लग्नाचे विधी सुरू असतानाच भरमांडवात हे लग्न करण्यास नकार दिला. हातरस जिल्ह्यातील नागला नवल गावातील रहिवासी जितेंद्र (२८) याचा विवाह पाचोखरा, फिरोजाबाद येथील रहिवासी भावना हिच्यासोबत निश्चित झाला होता. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचे लग्न झाले होते. लग्नाची वरात घेऊन वराचे कुटुंबीय मुलीकडे आले. सादाबाद येथील एका गेस्ट हाऊसमध्ये या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वरमाला घातल्यानंतर वधू-वरांना मंडपात आले. ते सप्तपदी घेत होते, तीन फेरे पूर्ण झाले होते.

नवरा दारूडा आहे समजताच वधूने…

तेवढ्यात वधूला समजलं की तिचा होणार नवरा हा दारूडा आहे आणि लग्नाला येतानाही त्याने मद्यपान केले आहे. हे कळताच नवरीने लग्न करण्यास थेट नकार दिला. होणारा नवरा दारूडा आणि त्याने वडिलांकडे हुंडा म्हणून 15 लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळेच मी कोणत्याही परिस्थितीत लग्न करणार नाही, अस त्या वधूने स्पष्ट केलं.

पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण

पण नवऱ्या मुलाच्या सांगण्यायानुसार, तो काही मद्यपी नाही आणि त्याने हुंड्याचीही मागणी केली नाही. उलट तो ज्या मुलीशी लग्न करणार होता तिचा घटस्फोट झाला होता, पण ही वस्तुस्थिती मुलीच्या घरच्यांनी लपवून ठेवली होती, असा आरोप त्याने लावला. हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिस अधिकाऱ्यांनी दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही. अखेर ठरलेलं लग्न मोडलं आणि वधूशिवायच वऱ्हाडी घरी परतले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.