रेल्वेची कमाल! बुलेट ट्रेनच्या आधीच वंदे भारत एक्सप्रेस सुस्साट, ताशी 180 किलोमीटर… राजधानी-शताब्दीलाही टक्कर

वंदे भारत एक्सप्रेसने 180 किमी/तास वेगाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. चाचणीदरम्यान हा वेग गाठून तिने भारतीय रेल्वेत नवा अध्याय सुरू केला. उत्कृष्ट सुरक्षितता वैशिष्ट्ये, 'कवच' प्रणाली आणि प्रवाशांसाठी आरामदायी सुविधांमुळे या ट्रेनची मागणी वाढली आहे. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन आता राजधानी व शताब्दीलाही टक्कर देत आहे.

रेल्वेची कमाल! बुलेट ट्रेनच्या आधीच वंदे भारत एक्सप्रेस सुस्साट, ताशी 180 किलोमीटर... राजधानी-शताब्दीलाही टक्कर
Vande Bharat Express
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 3:41 PM

भारतीय रेल्वेने मोठी कमाल केली आहे. भारतीय रेल्वेतील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतने नवीन रेकॉर्ड केलं आहे. या ट्रेनचा वेग प्रचंड वाढला आहे. ताशी 180 किलोमीटरचा वेग वंदे भारत एक्सप्रेसने पकडला आहे. देशातील सर्वात लग्जरी ट्रेन असलेल्या वंदे भारत चेअर कार ट्रेनने ट्रायल रनमध्ये 180 kmphची स्पीड पकडली आहे. वेस्टर्न रेल्वेला नागदा-कोटा-सवाई माधोपूर सेक्शनवर ट्रायल रनच्यावेळी वंदे भारत ट्रेनने सर्वाधिक स्पीड पकडला आहे.

वंदे भारतने फायनल स्पीड सर्टिफिकेट मिळण्याच्या आधी रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गेनायजेशन (RDSO)ने हा ट्रायल रन पूर्ण केला आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीच्या मॉर्डन कोच फॅक्ट्रीमध्ये तयार झालेल्या वंदे भारत चेअर कार रेकलाही अजून अनेक टेक्निकल ट्रायलमधून जावं लागणार आहे. या ट्रायल रेकच्या वेळी ट्रेनचा परफॉर्मन्स पाहिला जाणार आहे. त्याची रायडिंग क्वॉलिटी, स्टॅबिलीटी, सेफ्टी आदी अनेक पॅरामीटर चेक करण्यात येणार आहेत.

अजून ट्रायल रन बाकी

180 किलोमीटरची टेस्ट रन पास करण्याचा अर्थ असा नाही की ट्रेन पटरीवरून प्रवाशांसाठी धावेल. या ट्रेनची अजून एक फायनल टेस्ट होणार आहे. त्यानंतरच ही ट्रेन पटरीवरून धावेल. ऑसिलेशन ट्रायल, कपलर फोर्स, एमर्जन्सी ब्रेकिंग ट्रायल आदी टप्पे या ट्रेनला पूर्ण करावे लागणार आहेत. लोडेड ऑसिलेशन टेस्टनंतर ट्रेनला या टेस्ट पास कराव्या लागणार आहेत.

वंदे भारतची सर्वाधिक मागणी

देशात वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता प्रचंड आहे. देशात 162-164 वंदे भारत वेगवेगळ्या मार्गावर धावत आहेत. यावर्षीच 2047 पर्यंत देशात 4500 वंदे भारत ट्रेन धावण्यासाठी सज्ज आहेत. सध्या तरी देशातील ही सर्वात हायस्पीड ट्रेन आहे. सध्या ही ट्रेन ताशी 180 किलोमीटर वेगाने दावत आहे. खरेतर या ट्रेनची वास्तविक स्पीड ताशी 130 ते 160 किलोमीटर आहे. प्रचंड वेग आणि अॅडव्हान्स सेफ्टी फिचर्स यामुळे ट्रेनची डिमांड खूप वाढली आहे. त्यामुळेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या राज्यात या ट्रेनची मागणी वाढत आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टिम कवच, सीसीटीव्ही कॅमेरा, एमर्जन्सी अलार्म पूश, टॉक बँक युनिट, सेंट्रली कंट्रोल्ड ऑटोमॅटिक प्लग डोअर सारखे फिचर्ससह आरामदायी सीट, एक्झ्युक्युटिव्ह क्लास सीटिंग, यूव्हीस बेस्ड एअर डिसइन्फेक्शन सिस्टिम आदी गोष्टींमुळे या ट्रेनची लोकप्रियता वाढली आहे. वंदे भारत ट्रेन आल्यानंतर राजधानी, शताब्दी ट्रेनला मोठी टक्कर मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us