AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon News: शेतकऱ्यांनी सरकारला परत दिले मदतीचे चेक, कारण काय?

शेतकऱ्यांनी सरकारने केलेली 5000 रुपयांची मदत आणि त्यामध्ये  आणखी रक्कम ॲड करून 11 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिल्याची माहिती स्वत: मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. 

Jalgaon News: शेतकऱ्यांनी सरकारला परत दिले मदतीचे चेक, कारण काय?
| Updated on: Nov 08, 2026 | 7:49 PM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी

Jalgaon News: आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी सरकारने दिवाळीनिमित्त केलेली 5000 रुपयांची मदत करावी असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. गिरीश महाजन यांच्या या आवाहनावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र आता गिरीश महाजन यांच्या या आवाहनाला जळगावमधील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून जामनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून पाच हजारांच्या मदतीचे धनादेश परत केले आहेत.

जळगावमधील शेतकऱ्यांनी परत केली मदत! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनाला जळगावच्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जामनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सरकारने दिवाळीसाठी दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश परत केले आहेत. या शेतकऱ्यांनी सरकारने केलेली 5000 रुपयांची मदत आणि त्यामध्ये  आणखी रक्कम ॲड करून 11 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिल्याची माहिती स्वत: मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री गिरीश महाजनांचा रोहित पवारांवर पलटवार!

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या टिकेचाही चांगलाच समाचार घेतला.  “रोहित पवार हे नौटंकी आहेत. रोहित पवार यांना बोलताना लाज वाटली पाहिजे. रोहित पवार तुम्हाला मदतीचे 5 हजार आले तर ते ठेवायला तुम्हाला लाज वाटणार नाही? अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की  आम्हाला मदतीची आवश्यकता नाही परत करतो,अशा सधन शेतकऱ्यांना जर पैसे परत करायचे म्हटलं तर यामध्ये लाज वाटण्यासारखे आहे,” असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.

तसेच “रोहित पवार तुम्ही आमच्या जिल्ह्यातल्या चोपडा साखर कारखान्याचे कामगारांचे पावणे तीन कोटी देत नाही.  या कामगारांना तुम्ही उडवाउडवीचे उत्तर देतात, कामगारांचे पैसे परत करण्याबद्दल तुम्हाला लाज वाटत नाही का? नुसता शेतकऱ्यांबद्दल टेंभा तुम्ही मिरवता कामगारांचे पैसे बुडवताना तुम्हाला थोडीशी लाज वाटत नाही का? शेतकरी पैसे परत करत असतील तर या बाबाला (रोहित पवार) लाज वाटण्यासारखे काय?” अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा