तुमच्याही घरी या गोष्टी आहेत का? देतात सापांना निमंत्रण, त्या परिसरात एक तरी साप असतोच
सापांबद्दल आजही समजात अनेक गैरसमज आहेत. तसेच आपल्या मनात सापांबद्दल प्रचंड भीती देखील असते. आपल्याला जो साप दिसतो, तो प्रत्येक साप हा विषारीच असेल असं आपल्याला वाटत असतं, मात्र वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे. मात्र आपल्या घराच्या परिसरात अशा काही वस्तू नक्कीच असतात, ज्या सापांना आपल्याकडे आकर्षित करतात.

सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज आहेत. आपल्याला अनेकदा आपल्या सोसायटीमध्ये, घरता किंवा घराच्या परिसरात, बागेमध्ये साप आढळून येतो. मात्र आपल्याला जो साप दिसतो, तो प्रत्येकच साप विषारी आहे, अशी आपल्या मनाची ठाम समजूत झालेली असते. मात्र वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, परंतु त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या चार प्रजातींचा समावेश होतो. अर्थात या सापांच्या देखील काही उपजाती आहेत. जर तुम्हाला कुठेही साप आढळून आला तर त्याला मारू नका, सर्पमित्रांना फोन करा, ते तुमच्या घरी येऊन या सापांना सुरक्षित रेस्क्यू करतील आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात सोडतील. आपल्या घराच्या अवतीभोवती अशा काही वस्तू असतात, अशा काही गोष्टी असतात, ज्या सांपांना आपल्या घरात येण्याचं निमंत्रण देतात. अशा घराच्या आसपास एक तरी साप आढळून येतोच.
पक्ष्याची घरटे – जर तुमच्या घराच्या आसपास किंवा घरात कुठेही पक्ष्याची घरटे असतील तर अशा ठिकाणी पक्ष्याची शिकार करण्यासाठी त्यांची अंडी खाण्यासाठी साप हमखास येणारच. जिथे पक्ष्याची घरटी असतात, त्या परिसरात सापांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात असतो. कारण या ठिकाणी सापांना फार कष्ट न करता आयती शिकार मिळते, त्यामुळे अशा ठिकाणी शक्यतो साप आढळून येतात. त्यामुळे सावधं असणं गरजेचं असंत.
उंदरांची बिळं – जर तुमच्या घरातमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर झाले असतील तर अशावेळी साप देखील त्या ठिकाणी असतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना त्या ठिकाणी सहज शिकार मिळते आणि उंदराच्या बिळांमध्येच लपण्याची देखील सोय होते. त्यामुळे घरात उंदीर जर जास्त असतील तर त्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे.
घरात अडचण – सापांना ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे, तसेच ज्या ठिकाणी लपण्यासाठी पुरेसा अंधार आहे, अडचण आहे, अशा जागा आवडतात, अशा ठिकाणी अनेकदा साप आढळून येतात, त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे.
