AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharashiv News: एकनाथ शिंदेंचा खास शिलेदार अडचणीत! कारखान्यासमोर मृतदेहासह आंदोलन, कामकाज बंद पाडलं

मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांसह ऊसतोड कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या चार तासांपासून मृतदेहासह तीव्र आंदोलन सुरु केले आहे. कारखान्याच्या गव्हाणीमध्ये बसून हे आंदोलन सुरु असून फॅक्टरीचे कामकाजही कामकाजही बंद करण्यात आले आहे.

Dharashiv News: एकनाथ शिंदेंचा खास शिलेदार अडचणीत! कारखान्यासमोर मृतदेहासह आंदोलन, कामकाज बंद पाडलं
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 08, 2026 | 7:08 PM
Share

Dharashiv Sugar Factory Worker Protest:  धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर कारखान्यासमोर ऊस तोड मजुरांनी आंदोलन सुरु केले असून परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ट्रॅक्टर चालक महादेव मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईक आणि ऊसतोड कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर…

ऊसतोड कामगारांचे मृतदेहासह आंदोलन

समोर आलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर कारखान्यात सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महादेव मुंडे या ट्रॅक्टर चालकाच्या मृत्यूवरुन ऊसतोड कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महादेव मुंडे यांचा ढोकी-कळंब रोडवर अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मात्र अपघातानंतर कारखाना व्यवस्थापनाने वेळीच लक्ष दिलं असतं, तर महादेव मुंडे यांचे प्राण वाचले असते, असा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात कारखाना व्यवस्थापनाच्या दुर्लक्षाची चौकशी करावी आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांसह ऊसतोड कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या चार तासांपासून मृतदेहासह तीव्र आंदोलन सुरु केले आहे. कारखान्याच्या गव्हाणीमध्ये बसून हे आंदोलन सुरु असून फॅक्टरीचे कामकाजही कामकाजही बंद करण्यात आले आहे.

आमदार तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढणार? 

मृतदेहासह सुरू असलेल्या या आंदोलनामुळे कारखाना परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या चार तासांपासून कारखान्याचं कामकाज ठप्प असून, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आता कारखाना व्यवस्थापन आणि आंदोलकांमध्ये काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा