सौदी अरेबिया हादरलं, भीषण हल्ला, हुती बंडखोरांनी थेट…
मोठी बातमी समोर येत आहे, हुती बंडखोरांकडून सौदी अरेबीयावर भीषण हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सौदी अरेबीयाकडून देखील या हल्ल्याच्या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, सौदी अरेबीयाची राजधानी रियाधवर पुन्हा एकदा इराणचं समर्थन करणाऱ्या हुती बंडखोरांनी भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सौदी अरेबियाचं मोठं नुकसान झालं आहे. या हल्ल्यामध्ये सौदी अरामकोच्या एका टॉवरचं मोठं नुकसान झालं आहे. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी हुती बंडखोरांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सौदी अरामकोच्या एका टॉवरचं नुकसान झालं आहे. एका रिपोर्टनुसार एक दिवसापूर्वी सौदी अरेबियाने यमनवर मोठा हल्ला केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून हुती बंडखोरांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. हुती बंडखोरांकडून यावेळी रियाधमध्ये असलेल्या किंग अब्दुल्ला फायनांशियल डिस्ट्रिकला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच परिसरात हे अरामको टॉवर आहे.
या हल्ल्यामध्ये या टॉवरच मोठं नुकसान झालं आहे. अनेक मजल्यांवरील काचांना तडे गेले आहेत. तसेच काही भाग कोसळला असल्याचं देखील वृत्त आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमधून या हल्ल्यांमध्ये या टॉवरचं नेमकं किती नुकसान झालं याचा अंदाज येत आहे. सौदी अरेबियाकडून या हल्ल्याला अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आला आहे.
हुती बंडखोरांनी रियाधच्या दिशेनं मिसाईल हल्ले केले होते. परंतु आम्ही त्या सर्व मिसाईलला हवेतच नष्ट केलं आहे,असं सौदीने म्हटलं आहे. मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी या संदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं रियाधच्या दिशेनं येणाऱ्या दोन क्रूज मिसाईलला हवेतच थोपवलं आणि त्यानंतर त्या मिसाईल नष्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर हल्ला केला होता. गेल्या काही दिवसांपासून हुती बंडखोरांचे सौदी अरेबीयावर हल्ले सुरूच आहेत, तर दुसरीकडे प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबीयाकडून यमेन वर हल्ले करण्यात येत आहेत. हुती बंडखोरांनी अमेरिका इराण युद्धात देखील इराणला समर्थन दिलं आहे. तसेच ते सौदी अरेबीयावर देखील हल्ले करत आहेत.
