Gift Tax : दिवाळीचं गिफ्ट घेताय? सावधान! जाणून घ्या कायदा अन्यथा…
तुम्ही दिवाळीचं गिफ्ट घेताय, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही महागडी वस्तू घेत असाल, तर टॅक्सविषयीचा कायदा जाणून घ्या.

Image Credit source: टीव्ही9 मराठी
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मित्र परिवार एकमेकांना गिफ्टचं वाटप करतात. अनेक जण एकमेकांना पैशांचं देखील वाटप करतात. एका कंपनी, व्यवसाय मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना लाख रुपये भेटवस्तू म्हणून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
- तुम्ही दिवाळीनिमित्त काही गिफ्ट घेण्याआधी टॅक्सविषयी जाणून घ्यायला हवा. तुम्ही टॅक्सचा कायदा जाणून न घेतला तर महागात पडू शकते.
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या गिफ्टवर आयकर विभागाची नजर असू शकते. अनेकांना वाटते की, 50000 पर्यंतची भेटवस्तू टॅक्स-फ्री असते. परंतु तुमचा अंदाज चुकू शकतो.
- प्रत्येक व्यक्तीला आर्थिक वर्षात मिळणाऱ्या 50000 रुपयांपर्यंतच्या गिफ्टवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. वर्षभरात मिळणाऱ्या 50000 रुपये किंमतीहून अधिकच्या गिफ्टवर टॅक्स लागू होतो.
- तुम्ही 50000 हून अधिक किंमतीचं गिफ्ट स्वीकारलं, तर ती संपूर्ण रक्कम करपात्र होऊ शकते. त्यामुळे गिफ्ट घेताना काळजी घ्यावी. अन्यथा तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.
Follow Us





