AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: ना जुन्या पराभवाचा बदला घेता आला, ना थेट सेमीफायनल गाठता आली! पाकिस्तानने पुन्हा भारताला नमवलं, आता पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK: पाकिस्तानकडून पुन्हा भारताचा पराभव झाला आहे. अंडर-19 आशिया कपमध्ये टीम इंडियाचं थेट सेमीफायनल गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे.

IND vs PAK: ना जुन्या पराभवाचा बदला घेता आला, ना थेट सेमीफायनल गाठता आली! पाकिस्तानने पुन्हा भारताला नमवलं, आता पुढचा मार्ग खडतर
Pakistan Hand India Another Defeat in U-19 Asia Cup
| Updated on: Nov 08, 2026 | 6:27 PM
Share

अंडर-19 आशिया कप 2026 मधील सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. हा सामना गमावल्यानंतर थेट उपांत्य फेरीत पोहोचण्याचे भारताचे स्वप्न भंगलं आहे. ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर पाकिस्तानने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला.  गेल्या अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यातही भारताला पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा सामना जिंकून जुना हिशोब चुकता करण्याच्या भारतीय संघांच्या आशा धुळीस मिळाल्या आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 208 धावा केल्या होत्या. पाकिस्तानसमोर भारताने 209 धावांचे लक्ष ठेवले होते.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 208 धावा केल्या. पाकिस्तानसमोर 209 धावांचे लक्ष्य होते. भारताकडून अर्जुन राजपूतने सर्वाधिक 107 धावा केल्या. काव्य पटेलने 23, तर आर्यवीर सेहवागने 22 धावांचे योगदान दिले. कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी शून्यावर बाद झाला. भारतीय फलंदाज त्याच पद्धतीने बाद होत राहिले. आर्यवीर सेहवागने 40 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या. व्ही. के. विनीतने 29 चेंडूंमध्ये 8 धावा केल्या, तर यशवर्धन चौहान 1 धावेवर बाद झाला.

एकापाठोपाठ एक विकेट पडत असताना, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन राजपूतने एक शानदार शतक झळकावले. अर्जुनने 85 चेंडूंमध्ये पाच षटकार आणि 11 चौकारांसह 107 धावा केल्या. खालच्या फळीतील फलंदाजांसोबत छोट्या भागीदारी करून त्याने 46.3 षटकांत संघाच्या 208 धावांच्या भागीदारीत महत्त्वाची भूमिका बजावली. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या काव्या पटेलने 23 धावा केल्या. मनाल चौहाननेही 11 धावा केल्या. पाकिस्तानकडून अली रझा, रिझवानुल्ला आणि निकब शफीक यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

अर्जुन राजपूतच्या शतकाच्या जोरावर भारताने 209 धावांचे लक्ष्य ठेवले, जे पाकिस्तानने 48.1 षटकांत सात गडी गमावून पूर्ण केले.पाकिस्तानने या स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय मिळवला. अर्जुनचे शतक हमजा झहूरने रोखले. हमजाने 108 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या. एका क्षणी तर असे वाटत होते की भारतच जिंकेल. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 14.4 षटकांत 61 धावांत पाच गडी गमावले. मात्र हमजाने पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्याने हसनेन अब्बाससोबत (67 चेंडूंत 38 धावा, दोन चौकार) सहाव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी 38 व्या षटकात संपुष्टात आली.

सहाव्या षटकापर्यंत पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. जहांगीर बिलालने 5 आणि उस्मान खानने 16 धावा केल्या. अब्दुल कादिरने 27 चेंडूंमध्ये 20 धावा जोडल्या. अहमद हुसेनने 8, मोहम्मद सय्यमने 4 आणि कर्णधार फरहान युसूफने 2 धावा केल्या. भारताकडून, मनाल चौहानने 10 षटकांत 32 धावा देऊन तीन बळी घेतले. मोहित उल्वाने दोन, तर इशान सूद आणि काव्या पटेलने प्रत्येकी एक बळी घेतला.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा