वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पहिले ट्रायल, सेमी हायस्पीड ट्रेनचा वेग होता…पाहा व्हिडिओ

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेन 2025 मध्ये तिच्या पहिल्या प्रवासाला निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही ट्रेन खास लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने अद्याप या गाड्यांचे मार्ग निश्चित केलेले नाहीत.

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पहिले ट्रायल, सेमी हायस्पीड ट्रेनचा वेग होता...पाहा व्हिडिओ
| Updated on: Jan 01, 2025 | 4:08 PM

Vande Bharat Sleeper Train: देशात वंदे भारत ही सेमी हायस्पीड ट्रेन आली. ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर लांब पल्ल्यासाठी स्लीपर ट्रेन सुरु करण्याची मागणी झाली. शेवटी भारतीय रेल्वेने वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला. नवीन वर्षात वंदे भारत स्लीपर ट्रेन पटरीवर धावणार आहे. या ट्रेनची ट्रायल यशस्वी झाली. तिचा ट्रायल दरम्यान वेग 115 Kmph होता. ही ट्रेन लांब पल्लाचा प्रवासाची गरज लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्निनी वैष्णव यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात या लग्झरी ट्रेनचे उद्धघाटन करण्यात येणार आहे.

पहिली ट्रायल यशस्वी

इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल लखनऊ येथील रिसर्च डिजाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गेनाइजेशन (RDSO) कडून करण्यात आली आहे. ट्रायलचा पहिला फेज झांसी डिव्हीजनमध्ये घेण्यात आला. 115 किलोमीटर प्रति तास वेगाने ही रेल्वे धावली. ही ट्रायल यशस्वी झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेनची ट्रायल लोडेड आणि रिकामी अशा दोन्ही माध्यमातून करण्यात आली.

दुसऱ्या ट्रायलमध्ये वेग असणार 180 किलोमीटर प्रति तास

रिपोर्टनुसार वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या दुसऱ्या फेजचे ट्रायल कोटा डिव्हीजनमध्ये होणार आहे. त्यावेळी ही ट्रेन 180 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे. तसेच ब्रेकिंग परफोर्मेंस आणि कपलर फोर्स ट्रायल्स करण्यात येणार आहे. कोटा डिव्हीजनच्या ट्रायलनंतर ट्रेनची ऑपरेशनल ट्रायल होणार आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन 2025 मध्ये तिच्या पहिल्या प्रवासाला निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही ट्रेन खास लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने अद्याप या गाड्यांचे मार्ग निश्चित केलेले नाहीत. मात्र, या गाड्या नवी दिल्ली-पुणे आणि नवी दिल्ली-श्रीनगर या लोकप्रिय मार्गांवर धावणार असल्याची चर्चा आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर आणि मार्ग निश्चित झाल्यानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाईल. वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषदेत पहिल्यांदा केली.