प्रसिद्ध लेखक पद्मभूषण डॉ. एस एल भैरप्पा यांचे निधन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

सुप्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार डॉ. एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी बंगळूरु येथे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक पत्रक जारी करत एस एल भैरप्पा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसिद्ध लेखक पद्मभूषण डॉ. एस एल भैरप्पा यांचे निधन,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली
SL Bairappa
| Updated on: Sep 24, 2025 | 9:31 PM

सुप्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार डॉ. एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी बंगळूरु येथे निधन झाले. ते 94 वर्षांचे होतं. बंगळूरुमधील राष्ट्रोत्थान रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भैरप्पा यांना हृदयरोगाचा त्रास होता. सहा महिन्यापूर्वी ते सकाळी फिरायला गेले असता जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना बंगळूरु येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक पत्रक जारी करत एस एल भैरप्पा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शोकसंदेशात म्हटले की, ‘प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, संशोधक, सरस्वती सन्मान आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाच्या बातमीने प्रचंड दुःख झाले आहे. पर्व, गृहभंग, धर्मश्री, मांद्र, भित्ती, सार्थ, आवरण आणि इतर अनेक कलाकृतींमध्ये त्यांच्या अनोख्या लेखनशैलीद्वारे, डॉ. भैरप्पा यांनी लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले. त्यांनी साहित्याच्या जगात उल्लेखनीय योगदान दिले.

कन्नड साहित्याच्या विकासाचे साक्षीदार म्हणून, त्यांनी त्यांच्या लेखनातून या भूमीचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून दिली आणि बौद्धिक विचारांच्या क्षेत्रात एक वेगळी छाप सोडली. डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी खूप जवळचे संबंध होते. त्यांनी राष्ट्रोत्थान साहित्य, मंथन कार्यक्रम, मंगळुरू साहित्य महोत्सव आणि इतर अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने, आम्ही डॉ. एस. एल. भैरप्पा यांना श्रद्धांजली आणि श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि दिवंगत आत्म्याला चिरंतन शांती लाभो.’

दरम्याम, एस. एल. भैरप्पा हे हसन जिल्ह्यातल्या चन्नरायपटना तालुक्यातल्या संथेशिवरा येथील रहिवाशी होते. त्यांनी हसन आणि म्हैसूरमध्ये शिक्षण घेतले. कालांतराने त्यांनी गुजरात आणि नवी दिल्लीसह देशाच्या विविध भागात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. ls राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सदस्यही होते. भैरप्पा यांनी कन्नडमध्ये 26 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्याच्या बऱ्याच कादंबऱ्या या अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत.