Video : मदतीसाठी गेलेल्या महिलेला पोलिस अधिकाऱ्यांनी लावली मसाज करायला

आपल्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी महिला वरिष्ठ अधिकारी शशिभूषण सिन्हा यांची मालिश करत असल्याचं समजतंय. संबंधित व्हिडिओ व्हायरल होताच, एसपी लिपी सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Video : मदतीसाठी गेलेल्या महिलेला पोलिस अधिकाऱ्यांनी लावली मसाज करायला
मदतीसाठी गेलेल्या महिलेला पोलिस अधिकाऱ्यांनी लावली मसाज करायला
Image Credit source: twitter
| Updated on: Apr 29, 2022 | 12:35 PM

नवी दिल्ली – देशात अनेकदा पोलिस (Bihar police) अधिकाऱ्यांचे कारनामे आपल्याला व्हिडीओच्या (Video) माध्यमातून पाहायला मिळतात. काही दिवसांपुर्वी पोलिस मद्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडीओ व्हायरला झाला होता. प्रत्येकवेळी व्हिडीओ व्हायरल होतो. त्यावेळी नवीन काय तरी बाहेर पडतं. गुरूवारी बिहारमध्ये पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. एक सामान्य महिला पोलिस स्टेशनमध्ये मदत मागायला गेली असता, तिच्याकडून मसाज (Massage) करून घेत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.


पोलिस अधिकारी निलंबित

वरिष्ठ अधिकारी शशिभूषण सिन्हा उघड्या अंगाने बेडवर बसून मोबाईल फोनवर बोलत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार महिलेचं काही काम असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. व्हिडीओमध्ये एक स्त्री मसाज करत आहे. तर दुसरी महिला पलंगाच्या समोरच्या खुर्चीवर बसलेली आहे. वरिष्ठ अधिकारी शशिभूषण सिन्हा त्या महिलांच्या आधाडकार्ड घेऊन कुठेतरी जाणार असल्याचं सांगत आहे. दोन व्यक्तीमध्ये संवाद सुरू आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याचं समजतंय. सदर प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.

प्रकऱणाची कसून चौकशी होणार

आपल्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी महिला वरिष्ठ अधिकारी शशिभूषण सिन्हा यांची मालिश करत असल्याचं समजतंय. संबंधित व्हिडिओ व्हायरल होताच, एसपी लिपी सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गुरुवारी संध्याकाळी एसपी लिपी सिंह यांनी सांगितले की, प्रभारी वरिष्ठ अधिकारी शशिभूषण सिन्हा यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे.