Video : सीडीएस जनरल बिपिन रावत आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवाला तामिळनाडूत भावूक निरोप, जनतेकडून शववाहिकेवर पुष्पवृष्टी

तामिळनाडूतून आज बिपिन रावत आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांचे पार्थिव दिल्लीसाठी रवाना झालं. त्यावेळी तामिळनाडूतील एका कस्ब्यातून जेव्हा सर्व पार्थीव घेऊन शववाहिका रवाना झाल्या त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहत हजारो लोकांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी अनेक नागरिक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

Video : सीडीएस जनरल बिपिन रावत आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवाला तामिळनाडूत भावूक निरोप, जनतेकडून शववाहिकेवर पुष्पवृष्टी
रावत आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवावर तामिळनाडूत नागरिकांकडून पुष्पवृष्टी
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 5:08 PM

मुंबई : सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat), त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य 11 सैन्य अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालाय. बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तामिळनाडूतून (Tamilnadu) आज त्यांचं पार्थिव दिल्लीसाठी रवाना झालं. त्यावेळी तामिळनाडूतील एका कस्ब्यातून जेव्हा सर्व पार्थीव घेऊन शववाहिका रवाना झाल्या त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहत हजारो लोकांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी अनेक नागरिक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

‘वीर वड़क्कम । भारतीय रक्षा दल के प्रमुख बिपिन रावत,उनकी पत्नी और सैन्य अधिकारियों के पार्थिव शरीर को लेकर सरकारी गाड़ियाँ जब तमिलनाडु के इस कस्बे से गुजरीं तो लोग भावुक हो गए और पुष्प वृष्टि करने लगे। देशभक्ति की यह धारा अविरल बहती रहे।’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

हेलिकॉप्टर अपघात नेमका कसा घडला? संरक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती दिली. कुन्नूर एअर बेसवरून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं. 12 वाजून 15५ मिनिटांने वेलिंग्टन एअरबेसला हेलिकॉप्टरला लँड करायचं होतं. कुन्नुर एअरबेसच्या एअर ट्रफिक कंट्रोलने जवळपास 12 वाजून 8 मिनिटांनी हेलिकॉप्टरशी आपला संपर्क तुटला. त्यानंतर कुन्नूर जवळ काही स्थानिक लोकांना आग लागल्याचं दिसलं. त्यावेळी पळतच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा मिलिट्री हेलिकॉप्टरचे अवशेषांना आग लागलेली त्यांनी पाहिली, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

आज संध्याकाळी सर्वांचे पार्थिव शरीर इंडियन एअर फोर्सच्या विमानाने दिल्लीत आणल्या जाणार आहे. सीडीएस रावत यांचा अंत्यसंस्कार मिलिट्री ऑनर्सनुसार केला जाईल. इतरांचाही मिलिट्री ऑनर्सनुसारच अंत्यसंस्कार केला जाईल, असं सांगतानाच ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वेलिंग्टनच्या हॉस्पिटलमध्ये लाईफ सपोर्टवर आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दुर्घटनेची चौकशी सुरू

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरींना घटना स्थळी कालच पाठवलं होतं. त्यांनी घटना स्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. काल वेलिंग्टनला जाऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर, गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

VIDEO: तो असंसदीय शब्द नाही, मी वापरलेला शब्द योग्यच, काय तक्रार करायची ती करा; राऊतांनी फटकारले