Waseem Rizvi: ‘मृत्यूनंतर माझ्यावर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करा’- वसीम रिझवीची घोषणा

वसीम रिझवीने एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, 'मी कुराणच्या 26 श्लोकांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्यात मानवतेबद्दल द्वेष पसरला होता. आता मुस्लिमांना मला मारायचे आहे, म्हणून मला मारण्याचा कट देशात आणि देशाबाहेर रचला जात आहे. मला कोणत्याही स्मशानभूमीत जागा देऊ नये, अशी घोषणा केली जात आहे.'

Waseem Rizvi: मृत्यूनंतर माझ्यावर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करा- वसीम रिझवीची घोषणा
शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आज हिंदू धर्म स्वीकारणार
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 2:26 PM

लखनऊ : उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी रिझवी यांनी एक मृत्युपत्र तयार केले असून त्यात त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी स्मशानभूमीत दफन करण्याऐवजी दहन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. डासना मंदिराचे महंत नरसिंह नंद सरस्वती यांच्या हस्ते मुखाग्नि दिली जावी, असेही त्यांनी म्हटलं आहे.

वसीम रिझवीने एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, ‘मी कुराणच्या 26 श्लोकांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्यात मानवतेबद्दल द्वेष पसरला होता. आता मुस्लिमांना मला मारायचे आहे, म्हणून मला मारण्याचा कट देशात आणि देशाबाहेर रचला जात आहे. मला कोणत्याही स्मशानभूमीत जागा देऊ नये, अशी घोषणा केली जात आहे. माझ्या मृत्यूनंतर शांतता असावी, म्हणून मी एक इच्छापत्र लिहून प्रशासनाला पाठवले आहे की, माझा मृतदेह लखनऊमध्ये राहणाऱ्या माझ्या हिंदू मित्राला देण्यात यावा आणि अंत्यसंस्कार करण्यात यावे. अग्नी स्वामी नरसिंहानंद देतील.’

वसीम रिझवी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून कुराणातील 26 आयते काढून टाकण्याची विनंती केली होती, मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर ते मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक संघटनांनी त्याच्या अटकेची मागणीही केली होती.

हे ही वाचा

VIDEO: 108 वर्षांपूर्वी काशीतून चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती कॅनडातून भारतात परत आली, मुख्यमंत्री योगींनी केली प्रतिष्ठापना

PHOTO: भोपाळमध्ये देशातील पहिल्या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदी आज उद्घाटन करणार