हिंदू-मुस्लिमांसाठी वेगवेगळं मतदान केंद्र बनवा, भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

"हिंदू वस्तीसाठी आणि हिंदू मतदारासाठी वेगळा पोलिंग बूथ बनवा. हिंदू मतदार मुस्लिम वस्तीतून गेल्यास त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यांना मतदानापासून रोखलं जाऊ शकतं, असं भाजप नेत्याच म्हणणं आहे"

हिंदू-मुस्लिमांसाठी वेगवेगळं मतदान केंद्र बनवा, भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे मागणी
suvendu adhikari
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 22, 2025 | 1:03 PM

पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच वक्फ सुधारणा विधेयकावरुन मोठा हिंसाचार झाला. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला एकवर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीने सोमवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे हिंदूंसाठी वेगळा पोलिंग बूथ स्थापन करण्याची मागणी केली. भाजप नेत्याने पश्चिम बंगालमध्ये हिंदू-मुस्लिमांसाठी वेगवेगळं मतदान केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

भाजप नेते सुवेंधु अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे हिंदूंसाठी वेगळं मतदान केंद्र बनवण्याची मागणी केली. भाजप नेत्याने हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळ पोलिंग बूथ उभारण्याची मागणी केली. जिथे 50 टक्क्यापेक्षा कमी हिंदू मतदार आहे, हिंदू वस्तीसाठी आणि हिंदू मतदारासाठी वेगळा पोलिंग बूथ बनवा. हिंदू मतदार मुस्लिम वस्तीतून गेल्यास त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यांना मतदानापासून रोखलं जाऊ शकतं, असं भाजप नेत्याच म्हणणं आहे.

‘हिंदू संकटात आहेत’

सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालमधील भाजपचे मोठे नेते असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते सोमवारी म्हणाले की, “ममता बॅनर्जी सरकारच्या कुशासनामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदू संकटात आहेत. ते राज्यात अनेक ठिकाणी लोकशाही अधिकाराचा वापर करु शकत नाहीत. मतदान करु शकत नाहीत. जिथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत, तिथे हिंदू मतदारांना धमकावण्याचे आणि मतदानपासून रोखण्याचे प्रकार समोर आले आहेत.”

‘म्हणून ते हिंदुंना वाचवत नाहीयत’

सुवेंदु अधिकारी यांनी हिंदू अल्पसंख्यांक आहेत, तिथे वेगळं मतदान केंद्र उभारण्याची मागणी केलीच, शिवाय अशा ठिकाणी हे मतदान केंद्र उभारा जिथे हिंदुंना मुस्लिम वस्तीतून जाण्याची गरज पडणार नाही. वक्फ सुधारणआ विधेयकावरुन पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये सांप्रदायिक हिंसाचार झाला. भाजपने यावरुन TMC सरकारवर हल्लाबोल केला. फक्त मुस्लिम मतपेटी कायम ठेवण्यासाठी ते हिंदुंना वाचवत नाहीयत असा आरोप भाजपने केला.