West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये मोठा गेम! ममता बॅनर्जींना धक्का, मतमोजणीच्या पहिल्या तासात ट्विस्ट

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या एका तासामध्येच निकालात मोठा ट्विस्ट आला आहे. टीएमसी की भाजप कोणाला बहुमत मिळाले पाहा...

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये मोठा गेम! ममता बॅनर्जींना धक्का, मतमोजणीच्या पहिल्या तासात ट्विस्ट
west-bengal
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2026 | 9:25 AM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या तासाभरातच अत्यंत धक्कादायक आणि चुरशीचे कल समोर येत आहेत. राज्यामध्ये यंदा ‘सत्तापालट’ होणार की ममता बॅनर्जी आपली सत्ता टिकवून ठेवणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पहिल्या एक तासामध्ये नेमकं कोण पुढे आहे जाणून घ्या…

सुरुवातीचे कल (सकाळी ९ वाजेपर्यंत)

मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. ताज्या आकडेवारीनुसार:

भाजप (BJP): ८५ जागांवर आघाडी

तृणमूल काँग्रेस (TMC): ८२ जागांवर आघाडी

काँग्रेस: ०२ जागांवर आघाडी

बहुमतासाठी १४८ हा जादूई आकडा गाठणे आवश्यक असून सध्या भाजप आणि टीएमसीमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे.

मतमोजणीपूर्वी बिधाननगरमध्ये तणाव

निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बिधाननगर येथे मोठा राडा झाला. शनिवारी रात्री स्ट्रॉंग रूमबाहेर भाजप आणि टीएमसी समर्थक आमनेसामने आले. घोषणाबाजीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. अखेर केंद्रीय दलाने आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

महत्त्वाचे मतदारसंघ आणि मतदान

यंदा बंगालमध्ये दोन टप्प्यांत (२३ आणि २९ एप्रिल) मतदान झाले असून विक्रमी ९२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वांच्या नजरा या प्रमुख जागांवर आहेत:

भवानीपूर: ममता बॅनर्जी

फाल्टा: अभिषेक बॅनर्जी

नंदीग्राम: चुरशीची लढत

मेदिनीपूर पट्टा: सुवेंदु अधिकारी यांचा प्रभाव असलेला भाग.

एक्झिट पोल

बहुतेक एक्झिट पोलनी यंदा तृणमूल काँग्रेसला धक्का बसून भाजपला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत टीएमसी २०० हून अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

पार्श्वभूमी

२०२१ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २१५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता, तर भाजप ७७ जागांवर थांबला होता. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत भाजपने मुख्य विरोधी पक्ष म्हणून ममता बॅनर्जींच्या सत्तेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

Follow Us