AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banking News: LPG सबसिडी तपासायला गेली अन् बँक खात्यात दिसले तब्बल 100 कोटी! बँक कर्मचारीही आश्चर्यचकित

36 वर्षीय काश्मिरा शेख बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील पीएनबीच्या कुलतली जामताला शाखेत गेल्या.  एलपीजी सिलेंडरचे अनुदान आले आहे की नाही ते तपासायचे असल्याने त्या बँकेत गेल्या. जेव्हा बँक अधिकाऱ्याने त्यांना त्यांच्या खात्यात नुकत्याच जमा झालेल्या रकमेबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यांना धक्काच बसला.

Banking News: LPG सबसिडी तपासायला गेली अन् बँक खात्यात दिसले तब्बल 100 कोटी! बँक कर्मचारीही आश्चर्यचकित
| Updated on: Aug 03, 2026 | 11:56 AM
Share

36 वर्षीय काश्मिरा शेख बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील पीएनबीच्या कुलतली जामताला शाखेत गेल्या.  एलपीजी सिलेंडरचे अनुदान आले आहे की नाही ते तपासायचे असल्याने त्या बँकेत गेल्या. जेव्हा बँक अधिकाऱ्याने त्यांना त्यांच्या खात्यात नुकत्याच जमा झालेल्या रकमेबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. काश्मिरा शेख यांच्या खात्यात 99,99,99,997 रुपये होते. काश्मिरा ॲस्बेस्टॉसचे छप्पर असलेल्या घरात राहतात. त्यांचे पती बॅग शिवण्याचे काम करतात आणि त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जरीचे भरतकाम करतात.  अशातच बँकेकडून अचानक समजले की त्यांच्या खात्यात 100 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे तर हे ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण त्यांना आणखी मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांना समजले की त्यांच्या खात्यात 100 कोटी रुपये पूर्ण होण्यासाठी फक्त 3 रुपये कमी आहेत पण त्यांचे एकमेव बँक खाते गोठवण्यात आले आहे.

काश्मिरा यांनी स्पष्ट केले, “मी एक एलपीजी सिलेंडर बुक केला होता.” सिलेंडर सबसिडी माझ्या खात्यात जमा झाली आहे का, हे तपासण्यासाठी मी बँकेत गेले. तेव्हा मला कळले की माझ्या खात्यात जवळपास 100 कोटी रुपये जमा झाले आहेत. सिलेंडर पुरवणाऱ्या एजन्सीलाही हे पैसे कसे आले याची कल्पना नव्हती. आम्ही बँक मॅनेजरकडे गेलो, आणि ते म्हणाले, “आम्ही काहीही सांगू शकत नाही. कृपया निघून जा.” ती म्हणाली की मी खूप गरीब आहे. मला तीन मुले आहेत. मी खूप घाबरली होती. खाते गोठवल्यामुळे आम्ही आमच्या दैनंदिन गरजांसाठी पैसेही काढू शकत नाही. आणि या कठीण काळात आम्हाला मदत करण्यासाठी आमच्याकडे दुसरे बँक खाते नाही. हे सर्व घडले कारण आमच्या खात्यात एक मोठी रक्कम जमा झाली, जी आम्ही कधीही मागितली नव्हती.” या जोडप्याने कुलतली पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली.

बंगालमधील बँकिंग व्यवहारात गडबड मात्र, असे समोर आले आहे की, एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झालेली काश्मिरा शेख ही एकमेव महिला नाही. अनधिकृतपणे असे मानले जाते की, ही सर्व्हरमधील तांत्रिक अडचण असून, त्यामुळे संपूर्ण बंगालमधील बँकिंग व्यवहारांवर परिणाम झाला आहे. कोलकातामधील बेलेघाटा येथे क्लाउड किचन चालवणाऱ्या नूपुर गुप्ता यांच्या खात्यात 47 कोटी रुपयांची अनाकलनीय रक्कम जमा झाल्यानंतर, पोलीस, बँक आणि आयकर विभागाकडून त्यांचीही संयुक्त चौकशी करण्यात आली. त्यांनी गेल्या शुक्रवारी या व्यवहाराची तक्रार केली होती. पीएनबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे, परंतु बँकेने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

Follow Us
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?