
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आजारी पडले आहेत. त्यामुळे 80 वर्षीय डोभाल यांना 27 ते 29 मे दरम्यान मॉस्कोत होणाऱ्या महत्वाच्या सुरक्षा परिषदेत जाता आले नाही. अजित डोभाल यांना कोणता आजार झाला आहे, त्याची चर्चा सुरु झाली आहे. डोभाल यांना सीजनल इन्फ्लूएंजा झाला असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. हा आजार तसा सामान्य आहे. परंतु डोभाल यांच्या वयामुळे तो चिंतेचा विषय निर्माण होऊ शकतो. काय आहे हा आजार? काय आहेत त्या आजाराची लक्षणे? जाणून घेऊ या…
सीजनल इन्फ्लूएंजा हा एक फ्लूचा प्रकार आहे. इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा हा आजार एक संसर्गजन्य आहे. हा आजार सहसा हिवाळा आणि पावसाळ्यात जास्त पसरतो. हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये हवेद्वारे, खोकल्याने, शिंकल्याने किंवा संक्रमित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने पसरतो. सामान्यपणे काही दिवसांत हा आजार बरा होतो. परंतु वयोवृद्ध आणि कमी प्रतिकारक्षमता असलेल्या लोकांसाठी हा गंभीर ठरु शकतो. सन 2025 मधील एका हेल्थ रिपोर्टनुसार, भारतात दरवर्षी 5-10% ज्येष्ठ नागरिकांना हा आजार होतो. तसेच 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये हा आजार गंभीर होण्याची शक्यता 30 टक्के वाढते. जेष्ठ व्यक्तींची प्रतिकारक्षमता वयानुसार कमी होते. वाढत्या वयाबरोबर रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. त्यातच या वयात हेल्थ प्रॉब्लम्स जसे हार्ट डिजीज, डायबिटीज येतात.
सीजनल इन्फ्लूएंजा अचानक येणारा आजार आहे. सामान्य लोकांमध्ये या आजाराची लक्षणे काही दिवसांत कमी होऊन जातात. परंतु 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हा आजार गंभीर होतो. या फ्लूमुळे निमोनिया, ब्रोंकाइटिस आणि ह्रदयासंदर्भात धोका वाढतो. 2025 मधील एक मेडिकल स्टडीनुसार, 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या फ्लू पासून निमोनिया होण्याचा धोका 20 टक्के वाढतो.