OK चा फुलफॉर्म काय? शब्दा शब्दाला बोलतात, पण 99 टक्के लोकांना माहीत नसणार

आपण सरासपणे एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना ओके या इंग्रजी शब्दाचा वापर करतो. हा शब्द आपण जरी दररोज वापरत असलो तरी देखील अनेक लोकांना ओकेचा फुलफॉर्म माहिती नसतो, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

OK चा फुलफॉर्म काय? शब्दा शब्दाला बोलतात, पण 99 टक्के लोकांना माहीत नसणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2025 | 8:43 PM

ओके OK हा एक असा शब्द आहे, ज्याचा वापर दररोज जवळपास सर्वचजण करतात. तुम्ही देखील दिवसातून अनेकवेळा ओके या शब्दाचा वापर बोलताना करत असाल. आपण आपल्या दैनंदिन जीवनात, फोनवर बोलताना, मोबाईलवर चॅट करताना, किंवा एखाद्या व्यक्तीशी समोरा-समोर बोलताना ओके या शब्दाचा वापर करतो. एखाद्या गोष्टीला आपली परवानगी आहे, किंवा समोरचा व्यक्ती आपल्याशी जे बोलला आहे, ते आपल्याला समजलं आहे, हे दर्शवण्यासाठी आपण ओके या शब्दाचा वापर करतो. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीनं सांगितलेलं एखादं काम करायचं असेल, त्यासाठी तुम्ही तयार आहात, हे दाखवण्यासाठी देखील ओके शब्द वापरला जातो.

आपण ओके या शब्दाचा दररोज अनेकदा उच्चार करतो, मात्र तुम्हाला माहीत आहे का? की ओके शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? या दोन अक्षरी शब्दाचा फुलफॉर्म नेमका काय आहे? OK हे दोनच शब्द आहेत, मात्र हे दोन शब्द अनेक वाक्यांचं काम एकाचवेळी पूर्ण करतात. चला तर जाणून घेऊयात ओकेचा फुलफॉर्म नेमका काय आहे, त्याबद्दल.

ओकेचा फुल फॉर्म

उपलब्ध माहितीनुसार ओके या शब्दाचा वापर ‘All Correct’ सगळं बरोबर हे दर्शवण्यासाठी करण्यात येतो. मात्र ‘All Correct’ चं “Oll Korrect” झालं, याचाच शॉर्टफॉर्म म्हणून पुढे OK या शब्दाची निर्मिती झाली. ओके या शब्दाचा सरळ अर्थ सांगायचा झाल्यास सगळं बरोबर किंवा ‘All Correct’ हाच आहे. तर काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की, Okay हा शब्द बरोबर आहे, मात्र त्याला लोक चुकीच्या पद्धतीनं OK असं लिहितात.

ओकेचा इतिहास 

बोस्टन मॉर्निंग पोस्टच्या एका अर्टिकलनुसार ओके या शब्दाचा सर्वात प्रथम वापर हा 19 शतकाच्या सुरुवातीला करण्यात आला होता. ओके हा शब्द तेव्हा देखील सर्व बरोबर आहे, हे दर्शवण्यासाठीच वापरला जायचा, मात्र त्याचा शॉर्टफॉम वापरण्याची पद्धत सुरू झाली. त्यातून ओके या शब्दाची निर्मिती झाली.